लोणीकंद येथे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. १३) समाधान शिबिराचे आयोजन 

शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरीकांना एकाच छताखाली घेता येणार

लोणीकंद : नागरीकांच्या दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी राज्यशासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या अनुषंगाने राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद येथे उद्या (सोमवार, ता. १३) रोजी सकाळी १० वाजता समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

      लोणीकंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळच्या बहुउद्देशीय इमारतीत, लोणीकाळभोर अपर तहसील कार्यालयाअंतर्गत आयोजित या शिबिरात प्रशासनाकडून रेशन कार्ड मध्ये नवीन नाव समाविष्ट करणे किंवा नाव कमी करणे, तहसीलदार उत्पन्न दाखला, शालेय विद्यार्थ्यांसाठी जातीचे दाखले, नॉन-क्रिमिलेअर, डोमिसाइल (अधिवास) दाखले, तुकडेबंदी शासन निर्णयानुसार मान्य नोंदी, ७/१२ उताऱ्यावरील चूक दुरुस्ती आणि वारस नोंदी करणे, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन आदीं योजनांचा लाभ नागरीकांना एकाच छताखाली घेता येणार आहे.    

      या समाधान शिबीर अभियानाच्या अनुषंगाने पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटातील लोणीकंद, भावडी, फुलगाव, तुळापूर, निरगुडी, वडगाव-शिदे, पेरणे, बकोरी, डाेंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, वढु खुर्द आदी गावातील लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, युवक मंडळे तसेच नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष  प्रदिपदादा कंद, भाजप क्रिडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे, जिल्हा परिषद सदस्य पै.किरण साकोरे, पंचायत समिती सदस्या सौ.मोनिका श्रीकांत कंद तसेच पंचायत समिती सदस्या सौ.राणी दत्तात्रय वाळके आदींनी केले आहे.

——————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button