युनिवर्सल स्कुल व ज्युनियर कॉलेजचा G-20 या संकल्पनेवर आधारित १९ वा ॲन्युअल डे समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
विविध राज्यातील संस्कृती व कला तसेच सामाजिक संदेश देत अनेक कलाविष्कारांचे आकर्षक सादरीकरण
पुणे : युनिवर्सल स्कुल व ज्युनियर कॉलेजचा G-20 या संकल्पनेवर आधारित १९ वा ॲन्युअल डे समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, एमटीआय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय राजेशिर्के, डायरेक्टर डॉ. निता राजेशिर्के, स्कुल कमिटी डायटेक्टर साईनाथ वाळके पाटील, प्रिंसिपल मिसेस लक्ष्मी सिंग आदींसह अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी G-20 या संकल्पनेवर आधारित विविध राज्यातील संस्कृती व कला तसेच सामाजिक संदेश देत अनेक कलाविष्कारांचे सादरीकरण मोठ्या आकर्षक पद्धतीने केले.
पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, शिक्षक व पालक यांचा योग्य समन्वय व एकत्रित प्रयत्न गरजेचे असल्याचे मत यावेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी व्यक्त केले. तर मुलांचे भाव विश्व खुलवण्यासाठी तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांचा अविष्कार जोपासण्यासाठी पालकांनी आपल्या इच्छा त्यांच्यावर लादण्यापेक्षा मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्या करीअरसाठी योग्य प्रोत्साहन देणे, आवश्यक असल्याचे सांगत डॉक्टर नीता राजेशिर्के यांनी पालकांना पालकत्वाच्या भूमिकेतून प्रभावी मार्गदर्शन केले.
स्कुल कमिटी डायटेक्टर साईनाथ वाळके पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रिंसिपल मिसेस लक्ष्मी सिंग यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय राजेशिर्के यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देवून उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
……….