घोडनदी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल ॲड. विकास फडतरे यांचा कोरेगाव ग्रामस्थांकडून सत्कार

समाजाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सामूहिकपणे प्रभावी काम करू : ॲड. विकास फडतरे

पुणे : घोडनदी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ॲड.विकास बाळासाहेब फडतरे यांचा प्रथमच कोरेगाव भीमा येथे ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

      यावेळी बोलताना, “वकिली हा न्याय, सत्य आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करणारा पवित्र व्यवसाय आहे. समाजाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सामूहिकपणे प्रभावी काम करण्याची ग्वाही देतानाच त्यासाठी प्रत्येक घटकाने आपली भूमिका जबाबदारीने पार पाडली पाहिजे,” असे आवाहनही घोडनदी बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. विकास फडतरे यांनी केले.

शिरूर तालुक्यातील महत्त्वाच्या घोडनदी बार असोसिएशनच्या सन २०२६-२७ च्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच पार पडली. अध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत ॲड. विकास फडतरे यांनी ॲड. भोलेनाथ पडवळ यांचा पराभव करून अध्यक्षपदावर विजय मिळविला. त्यांच्या विजयाबद्दल वकील बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मूळचे कोरेगाव भीमा येथील रहिवासी असलेले ॲड. फडतरे हे नोटरी तसेच वकिली व्यवसायाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असून तरुण वकील आणि सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे. त्यांचे वडील बाळासाहेब फडतरे यांनी हॉटेल व्यवसायाबरोबरच कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे. नव्या निवडीसह या सामाजिक परंपरेचा गौरव म्हणून ग्रामस्थांनी ॲड. विकास फडतरे यांचा सन्मान केला.

यावेळी सरपंच अनिकेत गव्हाणे, माजी सरपंच विजयराव गव्हाणे, अमोल गव्हाणे, संपतराव गव्हाणे, अरविंद गव्हाणे, गणेश गव्हाणे, अँड.बापुसाहेब गव्हाणे, रविंद्र फडतरे, बबुशा ढेरंगे, तानाजी ढेरंगे, नितीन गव्हाणे, चंद्रकांत गव्हाणे, ॲड. सचिन गव्हाणे, ॲड. निखिल ढेरंगे, राजेंद्र गवदे, ॲड. प्रताप साळुंके, ॲड.शिवराज साळुंके, ॲड. दिव्या गव्हाणे, स्वप्निल भालेराव आदीसह अनेक मान्यवर उपस्थितांनी ॲड. फडतरे यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी अपेक्षा व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देताना ॲड. विकास फडतरे म्हणाले, “बार असोसिएशनच्या सर्वांगीण विकासासाठी एकदिलाने बार असोसिएशनची एकजूट अधिक भक्कम करणे, तरुण वकिलांना मार्गदर्शन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, तसेच नागरिकांसाठी कायदेविषयक चर्चासत्रे, प्रशिक्षण कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले जाईल.”

सरपंच अनिकेत गव्हाणे यांनी स्वागत केले तर राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष, उद्योजक रविंद्र फडतरे यांनी आभार मानले.

………

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button