शांताराम बापू कटके यांचा विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा
जनतेच्या प्रेमाने कृतार्थ झालो - शांताराम कटके
पुणे : वाघोलीचे सुपुत्र, माजी उपसरपंच शांताराम बाप्पू कटके यांचा वाढदिवस वाघोली आणि खराडी परिसरात विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक प्रदीप वळसे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मंडळी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
शांताराम बाप्पू कटके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव, रक्तदान शिबिर, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर आणि महिला भगिनींसाठी एकदिवसीय मेहंदी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. वाघोली येथे संपन्न झालेल्या या कीर्तन महोत्सवास वाघोली तसेच खराडी परिसरातून मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दाखविला.
वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल १७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच अनेकांची आधार कार्ड नोंदणी व दुरुस्तीही करण्यात आली. तर महिला भगिनींना मेहंदी प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाचे वाघोली आणि परिसरात कौतुक होत असून स्थानिक नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत आभार व्यक्त केले.
जनतेच्या प्रेमाने कृतार्थ झालो !
माझ्या वाढदिवसानिमित्त गेले आठ दिवस कीर्तन महोत्सव, तसेच विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आले. कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून संतांच्या सुश्रुत वाणीतून समाजाचे प्रबोधन व्हावे, हाच प्रामाणिक प्रयत्न मित्र परिवाराचा होता. आपण सर्वांनी जे प्रेम दिले व जो उस्फुर्त प्रतिसाद दाखविला याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.
शांताराम बाप्पू कटके, मा. उपसरपंच; वाघोली.