शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजपरिवर्तनासाठी योगदान द्यावे : उत्तमराव भोंडवे
पेरणे येथे १४ शिक्षक दांपत्यांचा महात्मा फुले-सावित्रीबाई फुले ‘आदर्श शिक्षक दांपत्य‘ पुरस्काराने सन्मान; बालकुमार साहित्य संस्थेला १० हजारांची मदत

पुणे : शिक्षक हे समाजपरिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम असून, त्यांनी शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक बांधिलकीही जपावी, असे आवाहन उत्तम अण्णा भोंडवे यांनी केले. पेरणे-लोणीकंद येथील समाज प्रबोधन केंद्र व संत तुकाराम स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रात आयोजित महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक दांपत्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
पेरणे, (ता. हवेली) येथे समाज प्रबोधन केंद्र तसेच संत तुकाराम स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले तसेच डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आदर्श शिक्षक दांपत्य पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिरूर व हवेलीतील १४ शिक्षक दांपत्यांना आदर्श शिक्षक दांपत्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
शिक्षकांनी आपल्या जीवनातील अनुभव आणि सामाजिक जाणिवांचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव, वाचनाची आवड आणि माणुसकीची मूल्ये रुजविण्याचे काम शिक्षकांनी करावे, असे भोंडवे यांनी सांगितले. आपल्या जीवनातील विविध प्रसंगांचा दाखला देत त्यांनी शिक्षकांना सामाजिक बांधिलकी जपण्याचेही आवाहन केले.
पुरस्कारार्थी शिक्षक दांपत्यांना साडी, टॉवेल, टोपी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेला उत्तमराव भोंडवे यांच्या वतीने १० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राहुल चातुर, पदाधिकारी मनोहर परदेशी व अन्य पदाधिकाऱ्यांनी हा धनादेश स्वीकारला.
कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायणराव कंद, विकास सोसायटीचे अध्यक्ष रघुनाथ आप्पा कंद, श्रीमंतराव झुरंगे, मुख्याध्यापक शांतीलाल ब्राह्मणे, एकनाथ शिंदे, शिरूर-हवेली दिंडीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब कंद, बाजीराव कंद, गुलाबराव कंद, दत्तात्रय जगताप, सुहास ढमाले, सिताराम बाजारे, प्रकाश गोसावी, विनायक वाळके, राजू दाभाडे, सचिन विधाटे, माऊली धर्माधिकारी, सचिन शिवले तसेच माऊली झुरुंगे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारार्थी शिक्षक दांपत्यामध्ये उर्मिला व संजीव मांढरे, रेखा व मारुती कदम, सुनीता व काळूराम पिंगळे, संध्या व धर्मा धुमाळ, आशा व राजाराम सकट, जयश्री व सुनील पलांडे, संगीता व संतोष वेताळ, संगीता व किसान आंबवणे, मनीषा व सतीश केकान, सुलोचना व नवनाथ राऊत, मनीषा व गणेश होले, हर्षदा व मनोहर परदेशी, ललिता व राहुल चातुर, अंजुम व आयुब तांबोळी.
मनोहर परदेशी यांनी प्रास्ताविक केले. अॅड. विशाल कुलाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर राहुल चातुर यांनी आभार मानले. सत्कारमूर्ती शिक्षकांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
………..
फोटो : पेरणे : येथे आयोजित शिक्षक दांपत्य सन्मान समारंभात पुरस्कारार्थी शिक्षक दांपत्यासह उपस्थित मान्यवर.



