लोणीकंद येथील श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भूमकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के 

भूमकर विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा राखली कायम 

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या बारावी परीक्षेत श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भूमकर ज्युनियर महाविद्यालय, लोणीकंद येथील विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून महाविद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक : 

गौरी महेश मुंगुरवाडी – ८४.०० टक्के

द्वितीय क्रमांक : तन्मय महेश कुमार लोंढे — ७९.६७ टक्के

तृतीय क्रमांक: खुशी मधुराम मिस्त्री — ७३.०० टक्के

तसेच, वाणिज्य शाखेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे —

प्रथम क्रमांक: रिया कृष्णा अजगर — 70.83 टक्के

द्वितीय क्रमांक: पायल निलेश जगताप — 67.50 %

तृतीय क्रमांक: पूर्वा बालाजी करे — 63.33 %

या सर्व विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेत भर पडली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मारुती रामचंद्र भूमकर, प्राचार्य दिलीप धंगेकर तसेच सर्व शिक्षकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button