श्रावणी सोमवारनिमित्त लोकसेवा शैक्षणिक संकुलात भक्तिमय वातावरणात सामुहिक शंखनादासह पूजाभिषेक
भारतीय संस्कृती व परंपरांविषयी विद्यार्थ्यांमध्ये आदर व जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने लोकसेवा प्रतिष्ठानचे प्रमुख मा.आमदार दीपक पायगुडे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन

पुणे : दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त फुलगाव येथे लोकसेवा शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांकडून सामुहिक शंखनाद करीत महादेवाला पूजाभिषेक करण्यात आला. टाळ मृदुंगाचा गजर आणि ‘ॐ नम: शिवाय’च्या जपामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.

शिक्षक व विद्यार्थ्यांसह अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद आनंदराव पाबळे, शिक्रापूरचे युवा उद्योजक व लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे पालक महेंद्र साईनाथ मंडलिक तसेच लोणीकंद येथील डॉ.बसू विद्यालयाचे अध्यापक ईश्वर शिंदे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पूजाभिषेक संपन्न झाला.
श्रावण सोमवारचे धार्मिक महत्त्व तसेच भारतीय संस्कृती व परंपरांविषयी विद्यार्थ्यांमध्ये आदर व जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने लोकसेवा प्रतिष्ठानचे प्रमुख माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षिका व विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळी काढली होती.

या प्रसंगी प्रतिष्ठानचे संचालक नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य शरद मंडलिक, उपप्राचार्य श्री. तिरखुंडे, प्रशासन अधिकारी पांडुरंग जगताप, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुरेश पाटील, पर्यवेक्षक सोमनाथ अवचर, पखवाज वादक रणजित देशमुख, संदीप जाधव, अशोक पवार तसेच राजेंद्र भोसले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
धार्मिक कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना श्रावणी सोमवारनिमित्त आरोग्यदायी प्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रसाद वाटपाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी, एकोपा आणि संस्कारांची भावना दृढ झाली. पूजा-अर्चा, धार्मिक विधी आणि प्रसाद वाटपाने द्वितीय श्रावणी सोमवारचा हा कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
…………



