लोणीकंद येथे ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

लोकनायक जयप्रकाश नारायण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

पुणे : ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद येथे लोकनायक जयप्रकाश नारायण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने उल्लेखनीय शासकीय सेवा करणाऱ्या विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

    यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविकिरण कदम, विस्तार अधिकारी आर. टी. सात्रस, ज्येष्ठ पत्रकार शरद पाबळे, केंद्रप्रमुख शांता दिलीप इचके, सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. अब्दुलमतिन करीमभाई मोमीन, ग्रामपंचायत अधिकारी जालिंदर हरिभाऊ बोरावणे, यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, आरोग्य विभागातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

    यामध्ये मुख्याध्यापक एकनाथ मारुती शिंदे, बाबुराव कोकाटे, दीपक नरहरी वाबळे, आशा गीताराम शिंदे, दीपमाला सुभाष जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी शैला ज्ञानोबा फड, आरोग्य सेवक जीवन मुंडे, अंगणवाडी सेविका मुक्ता रामचंद्र कंद, वैशाली दिलीप झुरुंगे, उज्वला सुधीर कंद, वैशाली नवनाथ कोरेडे, शालन हरिभाऊ कंद तसेच ब्रांच पोस्टमास्टर अश्विनी शिवाजी ठोनगिरे यांचाही सन्मान करण्यात आला.

    यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव भोंडवे, हवेली बाजार समितीचे माजी उपसभापती नारायणराव कंद, रघुनाथआप्पा कंद, गुलाबराव नाना कंद, सोपानआप्पा कंद, रामदास जयवंत कंद, ह.भ.प. रवीतात्या कंद, संजय झुरुगे, दत्तात्रय जगताप, श्रीमंत झुरुंगे, माजी सरपंच संजय कंद, गजानन कंद, राहुलबापू शिंदे, विद्यमान सरपंच सागर कंद, निवृत्त पीएसआय संजय मगर, दत्तात्रय झुरंगे, कुंडलिक झुरुंगे, शिवाजी दिनकर कंद, गुलाबराव सरडे, नारायण सरडे, सुहास ढमाले, तुकाराम आबाजी कंद, विवेक दत्तात्रय कंद, माजी सैनिक धनाजी कंद, संभाजी कंद आदी मान्यवर उपस्थित होते.

    या प्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविकिरण कदम, पत्रकार शरद पाबळे, मुख्याध्यापक एकनाथ शिंदे, नव्याने विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झालेले विवेक कंद आणि विद्यमान सरपंच सागर कंद यांनी मनोगत व्यक्त केले.

    हवेली बाजार समितीचे माजी उपसभापती नारायणराव कंद यांनी स्वागत केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक उत्तमराव भोंडवे यांनी प्रास्ताविकात संघाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक झुरुगे यांनी सूत्रसंचालन केले, तर ह.भ.प. रवीतात्या कंद यांनी आभार मानले.

 ………

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button