लोणीकंद येथे श्रीरामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष डिप्लोमा-पॉलीटेकनिकच्या विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्राम उत्साहात संपन्न

भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, संस्थाप्रमुख शंकरकाका भूमकर आदींसह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांची उपस्थिती

पुणे : मुलांच्या भविष्याचा विचार करूनच योग्य करियर निवडीचा निर्णय पालक व विद्यार्थ्यांनी समन्वयाने घ्यावा व तो तडीस नेण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी योग्य समन्वयाने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा विद्याधर कंद यांनी केले. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चांगले करीअर, स्पर्धा परीक्षांमधील यश तसेच वैचारिक वृद्धीसाठी सोशल मिडीयाचा अतिरेकी वापर टाळून पुस्तक वाचनाची आवड जपावी, असे आवाहन लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी केले. 

    लोणीकंद (ता. हवेली) येथे श्रीरामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिप्लोमा-पॉलीटेकनिकच्या प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्राचा शुभारंभ इंडक्शन प्रोग्रामने उत्साहात करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद, मॉडर्न महाविद्यालयाचे अध्यक्ष सुरेश तोडकर, तसेच श्रीरामचंद्र महाविद्यालयाचे संस्थापक सचिव शंकरकाका भूमकर, खजिनदार उद्धव भूमकर, तंत्रसंचालक सिद्धांत शंकर भूमकर, डिप्लोमा समन्वयक आकाश चौरे आदींसह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 

     यावेळी पुढे बोलताना प्रदिपदादा कंद यांनी भूमकर कुटुंबाने मोट्या मेहनतीने हे विद्यालय उभे करून परिसरातील शेतकरी व कष्टकरी परिवारातील मुला-मुलींना अत्यंत माफक फी मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन जोपासत असलेल्या अभिमानास्पद अशा शैक्षणिक परंपरेचे व शैक्षणिक सेवेचे कौतुक केले. तसेच याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी उत्तुंग प्रगतीने येत्या काळात महाविद्यालयाचे नाव शिखरावर न्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छाही दिल्या.

      तसेच सर्जेराव कुंभार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दहावीनंतर व्यक्तिमत्व घडण्याचे आणि बिघडण्याचे वय असते त्या कारणास्तव विध्यार्थानी सोशल मिडीयाचा अतिरेकी वापर टाळावा व पुस्तकांचा वापर करून वाचनाची आवड निर्माण करावी, ज्यामुळे त्यांच्या वैचारिक वृद्धीत वाढ होते आणि भविष्यात मोठया शासकीय पदावर जाण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करता येते, याचबरोर मोबाईलच्या वापरामुळे विध्यार्थी दशेत नकळत होणारे गुन्हे आणि त्यासाठी शासनाचे कडक नियम व कायदे विध्यार्थाना आणि पालकांना सांगून त्यांचे प्रबोधन केले. 

        तर संघर्ष हेच यशाचे गमक असल्याचे सांगत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या क्षमता जाणून त्यादिशेने योग्य परिश्रमातून सुयश मिळवावे, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात संस्थाप्रमुख शंकरकाका भूमकर यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती व व्यक्तिमत्त्व विकासासाठी महाविद्यालय सातत्याने सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाहीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. संघर्ष करायला कोणतीही पळवाट नसून तुमच्या संघर्षात महाविद्यालय आणि स्वतः तुमच्या पाठीशी आहे. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करून आपल्या आई-वडिल्यांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसून मेहनत करून अभ्यास करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच गतवर्षी दिलेल्या उत्कृष्ट निकालाबद्दल शिक्षकांचे कौतुक करुन शाबासकीची थाप देत या यशाची पुनरावृत्ती करावी, अशी सदिच्छाही व्यक्त केली. 

     कार्यक्रमासाठी उपस्थित गुरुवर्य सुरज तोडकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले कि, ‘विद्यार्थ्यांनी त्याचे काम SMART पद्धतीने करावे. येणारा काळ हा डिजिटल आणि तांत्रिक शिक्षणाचा आहे, त्यामुळे विद्यार्त्यानी शिक्षणाचे महत्व समजून मेहनत घेतली. तर यश मिळते आणि त्याचा उपयोग देशसेवेसाठी करून सुजाण नागरिक असल्याचे कर्तव्यही पार पडता येते. 

      यावेळी नवीन शैक्षणिक धोरणानुसार राबवण्यात येणारा अभ्यासक्रम व त्याचे फायदे प्रवेशित विद्यार्थ्यांना आणि पालकांना समजावून सांगण्यात आले तसेच व्यक्तिमत्व विकास, विशेष गुणवैशिष्ट्ये, योगा आणि चिंतन, खेळ, इंडस्ट्रियल सहलींचा समावेश करून त्यांचा सर्वांगीण विकास करून तंत्रशिक्षणाची आवड निर्माण करून त्यांची प्रगती साधण्याचा प्रयत्नही महाविद्यालयाकडून केला जात असल्याचेही नमुद करण्यात आले.     

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख प्रा.भीमराव बोरुडे (स्थापत्य), प्रा. गुलनाझ सय्यद (संगणक), प्रा. रमेश बोलाडे (यांत्रिकी), प्रा. रामकृष्ण गुणवरे (विदयुत), प्रा. विकास गायकवाड, प्रा. सागर शिंदे, महादेव गोडसे, महेश खरपुडे तसेच सर्व शिक्षकवृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्नेहल दिवटे यांनी केले तर आभार प्रा.अक्षय खापेकर यांनी मानले.

—————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button