चाकण – शिक्रापूर रस्त्यावर हॉटेल यशराज इन एक्झिक्युटीव्हचा एक मार्चला सकाळी नऊ वाजता शुभारंभ
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ

पुणे : चाकण – शिक्रापूर रस्त्यावर पिंपळे जगताप नजीक करंदी (ता. शिरुर) हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज उपबाजार समिती समोर उभारण्यात आलेल्या हॉटेल यशराज इन एक्झिक्युटीव – क्लिक कलेक्शनचा उदघाटन शुभारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता.१) सकाळी नऊ वाजता होणार आहे.
माजी मंत्री, आंबेगावचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या हॉटेल यशराज इन एक्झिक्युटीव – क्लिक कलेक्शनचे उदघाटन तसेच संचालक राजेंद्र नानासाहेब सातव पाटील यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातून आजी – माजी आमदारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती सातव परिवाराकडून देण्यात आली.
……….