वर्धापन महोत्सवानिमित्त ३१ मार्चपर्यंत गजलक्ष्मी, गिरीराज व श्री लक्ष्मी ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी ठरणार फायदेशीर

वर्धापन महोत्सवानिमित्त दागिने घडणावळीवर ६० टक्के तर डायमंड खरेदीवर १० टक्के सवलत व गोल्ड कॉइन फ्री

पुणे : दागिने खरेदीचा विचार असेल तर महिला दिन व सुवर्णपेढीच्या वर्धापन महोत्सवानिमित्त दागिने घडणावळीवर थेट ६० टक्के तर डायमंड खरेदीवर १० टक्के सवलत व गोल्ड कॉइन फ्री या दुहेरी सवलत योजनेमुळे चंदननगर येथील गजलक्ष्मी ज्वेलर्स, पुण्यातील श्री लक्ष्मी ज्वेलर्स तर वाघोली व कोरेगाव भीमा येथील गिरीराज ज्वेलर्समध्ये ५ ते ३१ मार्च या दरम्यान दागिने खरेदी ग्राहकांना फायदेशीर ठरणार आहे.

नुकताच झालेला महिला दिन तसेच सुवर्णपेढीच्या वर्धापन महोत्सवानिमित्ताने चंदननगर, येथे वेदरीती कॉम्प्लेक्स मधील गजलक्ष्मी ज्वेलर्स, धनकवडी, पुणे येथे श्री लक्ष्मी ज्वेलर्स, तसेच वाघोली व कोरेगाव भीमा येथील गिरीराज ज्वेलर्सच्या सुवर्ण दालनात ५ ते ३१ मार्च या दरम्यान सुवर्ण दागिने व डायमंड खरेदीवर विशेष सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे.

पाच मार्चपासून सुरू झालेल्या या सवलत योजनेमध्ये दागिने घडणावळीवर थेट ६० टक्के सवलत तर ५० हजाराच्या डायमंड खरेदीवर १० टक्के सवलत अधिक गोल्ड कॉइन फ्री अशी दुहेरी सवलत मिळणार असल्याने ही तीनही दालने महिला भगिनींच्या गर्दीने फुलून गेली आहेत.

वर्धापन दिन महोत्सवानिमित्त चंदननगरमध्ये वेदरीती कॉम्प्लेक्स मधील गजलक्ष्मी ज्वेलर्सच्या भव्य दालनात महिला भगिनींचा स्नेह मेळावा तसेच नेत्रदिपक दागिन्यांचा ‘ज्वेलरी शो’ चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सुवर्ण व डायमंड दागिन्यांचे अप्रतिम कलेक्शनही सादर करण्यात आले. हॉलमार्कसह विविध दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीज तसेच टेम्पल, ब्रायडल तसेच डायमंड ज्वेलरीचे भव्य कलेक्शन महिलांचे खास आकर्षण ठरले. यावेळी उपस्थित मान्यवर, महिला भगिनीचा सन्मानही पेढीच्या वतीने करण्यात आला.

यावेळी उपस्थित मा. आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तर आलेल्या मान्यवरांचे गजलक्ष्मी ज्वेलर्सच्या सोनी परिवाराने तसेच श्री लक्ष्मी ज्वेलर्सच्या वर्मा परिवाराने स्वागत करून आभारही व्यक्त केले. तर निवेदक अतुल बनकर यांनी सूत्रसंचालन केले.

……..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button