महापालिका हद्दीत समाविष्ट ३४ गावांसाठी गठीत मूलभूत सोयी सुविधा समितीत शांतारामबापू कटके यांची निवड
निवडीनंतर अनेक मान्यवरांनी शांतारामबापू कटके यांची भेट घेत केले अभिनंदन
पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट ३४ गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील शासकीय समितीमध्ये वाघोलीचे माजी उपसरपंच शांताराम रंगनाथ कटके यांची शासन नियुक्त सदस्यपदी निवड झाली आहे. या समितीच्या माध्यमातून नागरीहिताच्या मूलभूत सोयी सुविधांबाबत नागरीकांना दिलासा मिळणार असल्याने वाघोली परिसरात आनंद व्यक्त होत आहे.
महानगरपालिका हद्दीत ३४ गावे समाविष्ट झाल्यानंतर तेथील ग्रामपंचायतींचा कारभार संपुष्टात आल्याने या भागातील पदाधिकाऱ्यांना नागरीकांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी सातत्याने महापालिकेत धावपळ करावी लागत असे. महानगरपालिका निवडणुकीपर्यंत यावर पर्याय म्हणून महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट ३४ गावांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नव्याने समिती गठीत करण्यात आली असून या समितीत १८ सदस्यांच्या नियुक्तीस शासनाने मान्यता दिली आहे.
या शासननियुक्त समितीत आणखी ९ सदस्यांचा समावेश करण्यास आला असून यामध्ये शांताराम रंगनाथ कटके (कटकेवाडी, वाघोली) यांच्यासह पांडुरंग एकनाथ खेसे (लोहगाव, वाघोली), बाबुराव दत्तोबा चांदेरे (सूस, म्हाळुंगे, बावधन), दत्तात्रय बबनराव धनकवडे (नऱ्हे, शिवणे, उत्तमनगर, धायरी), राकेश राजेंद्र कामठे (उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी), भगवान लक्ष्मण भाडळे (मंतरवाडी, देवाची ऊरुळी), गणेश बाळासाहेब ढोरे (ढोरेवस्ती, फुरसुंगी, भेकराई नगर), राहुल सदाशिव पोकळे (धायरी, पुणे), अजित दत्तात्रय घुले (मांजरी बु. ता. हवेली) आदींचा समावेश आहे.
महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट ३४ गावांत या समितीच्या माध्यमातून नागरीहिताच्या मूलभूत सोयी सुविधांबाबत नागरीकांना दिलासा मिळणार असल्याने नागरीकांत समाधानाचे वातावरण आहे. तर शांताराम रंगनाथ कटके यांची निवड जाहीर झाल्यानंतर आज अनेक मान्यवर, पदाधिकारी तसेच नागरीकांनी शांताराम कटके यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.
अनंत युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शांताराम बापू कटके यांनी यापूर्वी वाघोलीचे उपसरपंच म्हणून तर त्यांच्या पत्नी सौ अर्चना शांताराम कटके यांनी जिल्हा परिषद सदस्या म्हणून वाघोली व परिसरातील विकास कामात योगदान दिले असून त्यांना या भागातील नागरी प्रश्नांची जाण व ते सोडवण्याचा अनुभव आहे.
—————
महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट ३४ गावांतील नागरीकांची गरज ओळखून राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या दुरदर्शी नेतृत्वातून ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. या समितीच्या माध्यमातून वाघोली व परिसरात नागरीहिताच्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन नागरीकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
शांताराम रंगनाथ कटके – शासन नियुक्त सदस्य,
महापालिका माविष्ट ३४ गावांसाठी गठीत मूलभूत सोयी सुविधा समिती, महाराष्ट्र शासन
——–