कार्तिकी एकादशीसाठी आळंदीकडे जाणाऱ्या सिध्देश्वर प्रासादिक दिंडीचे पेरणेफाटा येथे उत्साहात स्वागत
सिध्देश्वर प्रासादिक दिंडीतील वारकर्यांचे लक्ष्मीनगर लेन नं.५ मधील नागरीकांकडून विणापूजन, चहापान व अल्पोपहाराने स्वागत

पुणे : कार्तिकी एकादशीसाठी हातात भगव्या पताका घेत टाळ, मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा – तुकारामचा जयघोष करीत आळंदीकडे निघालेल्या सिध्देश्वर प्रासादिक दिंडीचे पेरणे फाटा (ता. हवेली) येथे चहापान व अल्पोपहारासह मोठ्या भक्तीभावाने स्वागत करण्यात आले.
आळंदी येथे कार्तिकी एकादशी सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी दरवर्षी अनेक दिंड्या पायी आळंदीला जातात. पेरणे गावातून आळंदीला जाणाऱ्या सिध्देश्वर प्रासादिक दिंडीतील वारकर्यांचे पेरणेफाटा येथील लक्ष्मीनगर लेन नं.५ मधील नागरीकांनी मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले. विणेकरी व सहभागी वारकऱ्यांचे स्वागत, विसावा व अल्पोहारानंतर दिंडी आळंदीकडे मार्गस्थ झाली.
परिसरातील अनेक वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या या दिंडीत विणेकरी हभप बबनराव वाळके, ईश्वरभाऊ गाडुते, तुकाराम वाळके, गोरक्ष वाळके, दत्ताआबा वाळके, नवनाथ वाळके, विनायक वाळके, सौ.माधुरी वाळके आदींसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ वारकरी सहभागी झाले होते. यात महिला वारकर्यांची संख्याही लक्षणीय होती. विधिवत वीणापूजन, अल्पोहार व चहाचा आस्वाद घेतल्यानंतर ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा जयघोष करीत दिंडी आळंदीकडे मार्गस्थ झाली.
गल्ली नं.५ मधील श्री.ईश्वर लक्ष्मण शिंदे व सौ.शोभा ईश्वर शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात पत्रकार शरद पाबळे, सौ.वैशाली शरद पाबळे, श्री.हनुमंत पौळ, सौ.कमल हनुमंत पौळ, सौ.सुमन राजु म्हस्के, श्री.देविदास फेंगडे, श्री.विजय शिंदे, सौ.बबिता देविदास फेंगडे, सौ.पुजा कांबळे, कु.वैष्णवी गायकवाड, श्री.मन्मथ राजुरे, सौ.सुजाता राजुरे, सौ.श्रृती थिटे, कु.कौस्तुभ इश्वर शिंदे, कु.धीरज राजु म्हस्के, कु.लोकेश कैलास कुरसुंगे, कु.अनुराग देविदास फेंगडे, कु.प्रेम, कु.चिराग देविदास फेगडे आदींनी वारकऱ्यांचे स्वागत केले.
………….



