उत्कर्ष – VIII राष्ट्रीय परिषदेत डिजिटल युगातील संशोधनाचे महत्त्व अधोरेखित

'कटिंग एज रिसर्च अँड इनोव्हेशन' विषयावर पुण्यात डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथे दोन दिवसीय परिषद संपन्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट, लोहेगाव (पुणे) येथे “कटिंग एज रिसर्च अँड इनोव्हेशन” या विषयावर “उत्कर्ष – VIII” ही राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय परिषद ११ व १२ मार्च २०२६ रोजी संपन्न झाली.

       या परिषदेचे मुख्य संरक्षक म्हणून डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, अध्यक्ष, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांनी मार्गदर्शन केले. तर प्रा. (डॉ.) ई. बी. खेडकर, व्हाइस प्रेसिडेंट, अजिंक्य डी. वाय. पाटील ग्रुप व संचालक, डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट यांच्या नेतृत्वाखाली परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. परिषदेचे संयोजक डॉ. गणेश लांडे तर सहसंयोजक म्हणून डॉ. आशुतोष खेडकर, डॉ. सुमित बण्णकर आणि डॉ. चेतन सरवदे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच संशोधन केंद्र प्रमुख डॉ. चेतन खेडकर यांनी परिषद यशस्वी होण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली.

      परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-व्हाइस चान्सलर प्रा. (डॉ.) पराग कालकर उपस्थित होते. मान्यवर पाहुणे म्हणून प्रा. (डॉ.) वाल्मिक सरवदे, प्र-व्हाइस चान्सलर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि प्रा. (डॉ.) रिपू रंजन सिन्हा, चेअरमन व चान्सलर, लँगबस्टेक युनिव्हर्सिटी, न्यू जर्सी (अमेरिका) आदी उपस्थित होते.

      यावेळी प्रा. (डॉ.) सतीश शर्मा, प्र-व्हाइस चान्सलर, बीबीडी युनिव्हर्सिटी, लखनऊ;  प्रा. (डॉ.) श्याम शुक्ला, एनएसबी बेंगळुरू; प्रा. (डॉ.) राजविंदर सिंग, पंजाबी युनिव्हर्सिटी, पटियाला; प्रा. (डॉ.) दल्बीर कौशिक, महर्षी दयानंद विद्यापीठ, हरियाणा; डॉ. डी. चेनप्पा व डॉ. रमेश्वर राव, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद: प्रा. (डॉ.) फिलिपे रॉड्रिग्ज ई मेलो, सेंट झेविअर्स कॉलेज, गोवा; प्रा. (डॉ.) धनंजय मंडलिक, संचालक, सिबार, पुणे; प्रा. (डॉ.) विनोद मळकर, संचालक, संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट; प्रा. (डॉ.) भारत कासार, संचालक, कॅम्प एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि प्रा. (डॉ.) कुलदीप चरक, प्र-चान्सलर, लँगबस्टेक युनिव्हर्सिटी, न्यू जर्सी (अमेरिका) आदी मान्यवर उपस्थित होते.

       उद्घाटन प्रसंगी प्रा. (डॉ.) पराग कालकर यांनी डिजिटल युगातील संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करत संशोधन हे केवळ सैद्धांतिक न राहता समाज, उद्योग व तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष समस्यांवर आधारित असावे, असे प्रतिपादन केले. आधुनिक संशोधनात डेटा-आधारित विश्लेषण, डिजिटल साधने व प्रत्यक्ष क्षेत्रीय अभ्यास यांचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

        प्रा. (डॉ.) वाल्मिक सरवदे यांनी उद्योग-शैक्षणिक सहकार्याचे महत्त्व स्पष्ट करत अशा सहकार्यामुळे नवोन्मेषाला चालना मिळते आणि विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील वास्तव अनुभव मिळून रोजगाराच्या संधी वाढतात, असे सांगितले. परिषदेच्या प्रारंभी प्रा. (डॉ.) ई. बी. खेडकर यांनी स्वागतपर भाषण केले. त्यांनी डिजिटल युगातील संशोधन आणि नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित करत तंत्रज्ञानातील वेगवान बदलांच्या पार्श्वभूमीवर संशोधकांनी सर्जनशील व दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज असल्याचे नमूद केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

       परिषदेच्या पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात “एआय-चालित संशोधन आणि व्यवस्थापन” आणि “डिजिटल इनोव्हेशन इकोसिस्टम्सः इंडस्ट्री ४.०, स्टार्टअप्स आणि शाश्वत स्पर्धात्मक फायदा” या विषयांवर विशेष प्लेनरी सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान, संशोधनातील नवकल्पना आणि उद्योग क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांवर सखोल चर्चा करण्यात आली.

       परिषदेच्या दुसऱ्या दिवशी “स्मार्ट गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञान-सक्षम नेतृत्व, डिजिटल युगात संघटनांचे व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शनपर सत्रे झाली. तंत्रज्ञानाच्या युगात संस्थांचे व्यवस्थापन, नेतृत्व आणि परिवर्तन याविषयी मान्यवरांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले.

       यानंतर तांत्रिक सत्रात देशभरातील संशोधक व प्राध्यापकांनी एकूण ४८ संशोधन निबंधांचे सादरीकरण केले. या सत्राचे संयोजन डॉ. चेतन खेडकर आणि डॉ. गणेश लांडे यांनी केले. संशोधकांनी “कटिंग एज रिसर्च अँड इनोव्हेशन” या विषयाशी संबंधित विविध समकालीन विषयांवर आपले संशोधन निष्कर्ष मांडले.

      परिषदेचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. (डॉ.) सतीश शर्मा, प्र-व्हाइस चान्सलर, बीबीडी युनिव्हर्सिटी, लखनऊ हे उपस्थित होते. मान्यवर पाहुणे म्हणून प्रा. (डॉ.) फिलिपे रॉड्रिग्ज ई मेलो आणि प्रा. (डॉ.) कुलदीप चरक उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष प्रा. (डॉ.) ई. बी. खेडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि नवोन्मेषाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.

       मान्यवरांनी उच्च शिक्षण, संशोधनातील नवकल्पना आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करत संशोधकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या परिषदेत देशभरातील प्राध्यापक, संशोधक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून परिषद यशस्वी केली. समारोप प्रसंगी डॉ.गणेश लांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

———————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button