देवाभाऊंचं नेतृत्व.. हेच शेतकऱ्यांच्या हिताचं नेतृत्व
महाराष्ट्रातील शेतकरी बंधू-भगिनींच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार संपन्न

पुणे : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने शेतकरी बांधवांना मोठा दिलासा दिला आहे.
या आनंदाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकरी बंधू-भगिनींच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत भव्य सत्कार करण्यात आला. भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चातर्फे आयोजित या सोहळ्यात किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला.

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला त्या पाटीवर नव्याने इतिहास लिहिता आला पाहिजे,” या विचारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७.५ एचपीपर्यंतच्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांचे तब्बल ४८,००० कोटी रुपयांचे जुने थकीत वीजबिलही माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
हा निर्णय देवाभाऊंची शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता, बांधिलकी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित करणारा असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याचे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव यांनी सांगितले.
याशिवाय, देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार’ या देशातील सर्वात मोठ्या जलसंधारण अभियानामुळे महाराष्ट्रातील २० हजारांहून अधिक गावे जलसमृद्ध झाली.
कोणतीही निवडणूक डोळ्यांसमोर नसताना शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. कारण शेतकऱ्यांचे कल्याण हा आमच्यासाठी केवळ राजकारणाचा विषय नसून, सेवेचे व्रत आणि विकासाची बांधिलकी आहे.
या कार्यक्रम प्रसंगी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्यासह पुणे जिल्ह्यातील किसान मोर्चाचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. यामध्ये पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण काळभोर, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती संजीवनी कापरे, कैलासराव सोनवणे, सुभाष कांडगे, सतीश गायकवाड, योगिराज शिंदे, विद्याधर दरेकर, रेखा वाळके, अमोल सातव, रावसाहेब राखपसरे, माऊली बहिरट, मयूर शिंदे, वैजयंती चव्हाण, योगिता सातव आदिंसह अनेक महिला भगिनीही उपस्थित होत्या.



