कोरेगाव भीमा येथे भाजयुमोकडून प्रियांक खर्गे यांचा निषेध व जोडे मारो आंदोलन
पुन्हा अवमान केल्यास काँग्रेस नेत्यांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा
पुणे : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करीत आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा तसेच प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वतीने कोरेगाव भीमा येथे रस्त्यावर उतरत खर्गे यांच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात खर्गे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने संतप्त झालेल्या भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा गणेश कुटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव, दत्तात्रय हरगुडे, प्रवीण फडतरे, गणेश गव्हाणे, नितीन गव्हाणे, गौरव झुरुंगे, समीर झुरुंगे, राहुल कुटे, बापू भुजबळ, बाबासाहेब दरेकर, नवनाथ भुजबळ, रविंद्र गव्हाणे, नागेश गव्हाणे, संपत गव्हाणे, दत्ता जोरे, अमोल गव्हाणे, सतीश गव्हाणे, ओंकार गुंडाळ, सुनील सव्वाशे, दत्ता गव्हाणे, आयुष मिश्रा, ऋषिकेश गव्हाणे, अशोक हरगुडे, श्रीकांत नरके आदीसह तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील चौकात रस्त्यावर उतरत खर्गे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच खर्गे यांच्या फोटोला जोडे मारुन निषेध केला. तसेेच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना निवेदनही देण्यात आले.
गेली अनेक वर्षे काँग्रेसी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करत आहेत तसेच काल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र व कर्नाटक सरकार मधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह असून या वाईट मानसीकतेला आवर घालणे आवश्यक आहे. याचा निषेध करण्यासाठीच पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या वतीने हे जोडो मारो आंदोलन केल्याचे आंदोलक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यापुढे परत असा अवमान केल्यास काँग्रेस नेत्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असाही इशारा या वेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव व आंदोलकांनी दिला.
…….