‘आनंदयात्री’ भाऊसाहेबांचा आदर्श समाजाने घेण्याची गरज – सहकार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील
‘आनंदयात्री’ भाऊसाहेब साकोरे यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी - केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री ना. नितीन गडकरी
पुणे : ‘आनंदयात्री’ असलेल्या भाऊसाहेबांनी दातृत्व व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेकांना आनंद व समाधान देण्यात आपले आयुष्य वेचले, त्यामुळे त्यांचे जीवन सार्थक झाले, उद्योजक भाऊसाहेबांचा हा आदर्श समाजात इतरांनीही घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब साकोरे यांचा अमृतमहोत्सव सोहळा व ‘आनंदयात्री’ या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शिक्रापुर-चाकण रस्त्यावर चौफुला येथील मयुरी लॉन्स येथे नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनीही ‘लाईव्ह’ शुभेच्छा दिल्या.
‘आनंदयात्री’ भाऊसाहेब साकोरे यांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी होते. त्यांनी बांधकाम व्यवसायाबरोबरच सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रातही विविध समाज घटकांसाठी उत्तम कार्य केले. सामाजिक दायित्व सामाजिक संवेदनशीलताही त्यांनी जपली. त्यामुळे समाजमान्य लोकसेवक अशी त्यांनी ख्यातीही मिळवली. पंचायत समिती व बाजार समिती कार्यकाळात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्यासारखे दातृत्वशील व्यक्तिमत्व, अष्टपैलू नेतृत्व ही समाजासाठी फार मोठी संपत्ती आहे, या शब्दात ना. नितिन गडकरी यांनी भाऊसाहेबांना शुभेच्छा दिल्या.
या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, सुमंत बापू हंबीर, कृष्णराज शास्त्री पंजाबी, कृष्णगिरी महाराज, शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार, जिंतुर-सेलुच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे, वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जगदिश मुळीक, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरचे उपाध्यक्ष नारायण गलांडे पाटील, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक प्रकाश गलांडे, बाबासाहेब गलांडे, उद्योजक सदाशिवराव पवार, भगवानराव शेळके, कांतीलाल गवारे, सौ. सविता पऱ्हाड, उषाताई बढे, घोडगंगाचे माजी संचालक विठ्ठलराव ढेरंगे, केंदुरचे सरपंच अमोल थिटे, वाजेवाडीच्या सरपंच सौ. पुनम चौधरी आदींसह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उद्योजक भाऊसाहेब साकोरे यांच्या जीवनावर आधारित ‘आनंदयात्री’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर भाऊसाहेब साकोरे यांचे जीवनकार्य सांगणारी ध्वनी चित्रफीतह दाखवण्यात आली.
याप्रसंगी शुभेच्छा देताना श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘आनंदयात्री’चे चरीत्रनायक असलेल्या व सामाजिक सदभावनेचे भांडवल असलेल्या भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व हे आदर्श व सेवाभावी असल्याचे योग्य चित्रण लेखक दादाभाऊ गावडे व अनेक मान्यवरांनी आनंदयात्री ग्रंथात केले आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात मोठे काम असलेल्या व राजकारणात राहूनही दानशूर व सात्विक स्वभाव, जपणार्या निरपेक्ष स्वभावाच्या भाऊसाहेबांसारख्या नेतृत्वाची ग्रामीण भागालाच नव्हे तर महाराष्ट्राला गरज असल्याचेही श्रीपाल सबनीस यांनी नमूद केले.
तर अध्यात्माचे अभ्यासक असलेल्या भाऊसाहेब यांच्या सारख्या परमात्म स्वरूपाच्या व्यक्तीमत्वाचा हा अमृतमहोत्सव सोहळा असल्याचे सांगत हभप सुमंतबापू हंबीर यांनी भाऊसाहेबांना आशिर्वाद दिले.
सहकारमंत्री ना. दिलीप वळसे पाटील साहेबांनी जसा सध्या राजकीय निर्णय घेतला तसाच १९९८ मध्ये चांगल्या कामासाठी तत्कालीन भाजपशी युती करून मी भाऊसाहेबांना सभापती करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी शुभेच्छा देताना सांगितले.
तसेच आदर्श उद्योजक असलेल्या भाऊसाहेब साकोरे यांचे व्यक्तीमत्व सेवाभावी व आध्यात्मिक असेच असल्याचे माजी आमदार विलासराव लांडे यांनी सांगितले. तर भाऊसाहेबांनी आपल्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीत दातृत्वभावनेतून अनेक कामे साकारल्याचे प्रदिपदादा कंद यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना भाऊसाहेब साकोरे यांनी आई-वडिलांच्या संस्कारातूनच सामाजिक सद्भावना तसेच समाजसेवेची प्रेरणा मिळाल्याचे सांगत आयुष्यभर प्रामाणिकपणे व्यवसाय करताना अनेकांच्या जीवनात आनंद देता आला, याचे मोठे समाधान असल्याचे नमूद केले. तसेच या प्रवासात परिवारासोबतच अनेक घटकांनी योगदान दिल्याचे तसेच आनंद यात्री आणि अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अनेकांचे मोठे योगदान लाभल्याचेही आवर्जून सांगितले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या तसेच दिवसभरात भेट दिलेल्या अनेक मान्यवरांनीही भाऊसाहेबांना शुभेच्छा दिल्या.
अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ यांनी प्रास्ताविकात भाऊसाहेबांच्या जीवनकार्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा आढावा घेतला, तर कांतीलाल गवारे यांनी स्वागत केले. तसेच आनंदयात्री ग्रंथाचे लेखक दादासाहेब गावडे यांनी ‘आनंदयात्री’ साकारताना आलेले अनुभव कथन केले.
माजी सभापती भाऊसाहेब साकोरे अमृत महोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ, उपाध्यक्ष कांतिलाल गवारे, सचिव रंगनाथ हरगुडे, सहसचिव मारूती सिनलकर, तसेच उद्योजक रविंद्र भाऊसाहेब साकोरे, उद्योजक अविनाश भाऊसाहेब साकोरे आदींसह साकोरे परिवाराचे अनेक सदस्य व केंदुर ग्रामस्थ आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. निवेदक रामभाऊ साकोरे यांनी सुत्रसंचालन केले.
……..
मा. सभापती, उद्योजक भाऊसाहेब साकोरे यांचे जीवनकार्य सांगणारी ध्वनी चित्रफीत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.