श्रीक्षेत्र वढु बुद्रुकच्या सरपंचपदी सौ.अंजली प्रफुल्ल शिवले यांची बहुमताने निवड
पती, पत्नी दोघांनाही सरपंचपदी विराजमान होण्याचा मिळाला मान
पुणे : श्रीक्षेत्र वढु बुद्रुक (ता. शिरुर) ग्रामपंचायतीच्या झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत सौ.अंजली प्रफुल्ल शिवले यांची दहा मते मिळवून बहुमताने निवड झाली.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचे समाधिस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र वढु बुद्रुक ग्रामपंचायतीत सौ.सारिका अंकुश शिवले यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवडणुक घेण्यात आली. यात सरपंचपदासाठी सौ.अंजली प्रफुल्ल शिवले व वैभव अशोक भंडारे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने रितसर निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली.
या निवडणुक प्रक्रीयेत सौ.अंजली प्रफुल्ल शिवले यांना १० तर वैभव भंडारे यांना ३ मते मिळाली. त्यानंतर निवडणुक निर्णय अधिकारी विकास फुके यांनी सौ.अंजली प्रफुल्ल शिवले यांची सरपंचपदी निवड जाहीर केली. तर ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे यांनी त्यांना सहाय्य केले.
यावेळी सरपंच सारिका अंकुश शिवले, उपसरपंच राहुल ओव्हाळ, माजी सरपंच अनिल शिवले, सदस्या अंजली शिवले, संगीता सावंत, माजी उपसरपंच हिरालाल तांबे, ज्ञानेश्वर भंडारे, कृष्णा आरगडे, वैभव भंडारे, रेखा शिवले, शिलावती भंडारे, अनिता भंडारे, रोहिणी भंडारे यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बापुसाहेब शिंदे, वढु बुद्रुक सोसायटीचे अध्यक्ष व माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, माजी अध्यक्ष राजाराम आहेर, बापूसाहेब आहेर, काळूराम गोसावी, सोनेश शिवले, व्हॉईस चेअरमन अर्चना शिवले, भाऊसाहेब शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले, रमाकांत शिवले, बबन शिवले, संजय शिवले, ज्ञानेश्वर भंडारे, श्रीकृष्ण अरगडे, खंडु भंडारे आदींसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचीत सरपंच सौ.अंजली प्रफुल्ल शिवले यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळी नतमस्तक होत नवनिर्वाचीत सरपंच सौ.अंजली प्रफुल्ल शिवले यांनी राजांना अभिवादन केले. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाच्या विकासाबराेबरच गावातील विकासकामे व नागरीकांना वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याची ग्वाही सौ.अंजली प्रफुल्ल शिवले यांनी दिली.
पती, पत्नी दोघांनाही सरपंचपदी विराजमान होण्याचा मिळाला मान
श्रीक्षेत्र वढू बुद्रुकचे नवनिर्वाचित सरपंच अंजली शिवले यांचे पती प्रफुल्ल शिवले यांनीही यापुर्वी वढू बुद्रुकचे सरपंचपद भुषवले असून ते सध्या सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. तर अंजली शिवले यांचीही सध्या सरपंचपदी बहुमतोन निवड झाल्याने पती, पत्नी दोघांनाही सरपंचपदी विराजमान होवून ग्रामविकासाची संधी मिळाली आहे.
दुहेरी – दुग्धशर्करा योगाचा आनंद
अयोध्येत श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना वढुत मात्र प्रतिष्ठेच्या सरपंचपदाची निवडणुक सुरु होती. प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानंतर सरपंचपदी अंजली शिवले यांची बहुमताने निवड जाहीर होताच जय श्रीराम तसेच छत्रपती संभाजी महाराज की जय, श्री उधोबा महाराज की जय अशा घोषणांनी परिसर अक्षरश: दुमदुमून गेला.
————-