भारतीय जनता पार्टी प्रदेश निमंत्रित सदस्य ॲड. संजय सावंत यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेल उपाध्यक्षपदी निवड
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील प्रदेश कार्यालयात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या
पुणे : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे निमंत्रित सदस्य संजय दत्तात्रय सावंत (पाटील) यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य प्रदेश लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. उदयजी डबले, प्रदेश प्रभारी ॲड. धर्मेंद्रजी खांडरे, महाप्रदेश संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. संजय दत्तात्रय सावंत (पाटील) यांना महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्यात आली.भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील प्रदेश कार्यालय महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक जिल्ह्यातील नेत्यांचे पक्षप्रवेश झाले तसेच पदाधिकारी बैठक घेण्यात आली. यामध्ये अँड. संजय दत्तात्रय सावंत (पाटील) यांना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश लिगल सेल उपाध्यक्ष पदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
ॲड.संजय दत्ताञय सावंत (पाटील) हे गेली पाच वर्षापासुन भारतीय जनता पार्टी मध्ये पुणे जिल्हा कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य, स्वच्छ भारत अभियान मध्ये महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस, शिरुर लोकसभा संयोजक समिती सभासद, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कायदेशीर सल्लागार अशा पदांवर सर्व कार्यरत आहेत. तसेच गेली १६ ते १७ वर्षापासुन सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक संघटना सोबत महाराष्ट्राभर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत, वकीली पेशात कार्यरत असताना सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यात त्यांचा पुढाकार असतो. या सर्व बाबींची दखल घेत त्यांना भारतीय जनता पाटीने प्रदेश कमिटीत काम करण्याची संधी दिली आहे.
यापुढील काळात केंद्रसरकारच्या व राज्यसरकारच्या संपुर्ण योजना राज्यभरात सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचवणे, जनजागृती करणे तसेच पक्षासाठी संघटनात्मक बांधणीचे करणार असल्याची ग्वाही त्यांनी निवडीनंतर दिली.