कार्तिकी एकादशीसाठी आळंदीकडे जाणाऱ्या दिंड्यांचे पेरणेफाटा येथे अल्पोपहाराने स्वागत
पेरणे फाटा (ता. हवेली) येथे विसावा व अल्पोपहार घेऊन दिंड्यांचे आळंदीकडे प्रस्थान
पुणे : हातात भगव्या पताका घेत टाळ, मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा – तुकारामचा जयघोष करीत अनेक दिंड्यांचे आज कार्तिकी एकादशीसाठी आळंदीकडे प्रस्थान झाले. दरम्यान पेरणे फाटा (ता. हवेली) येथे विसावा व अल्पोपहार घेऊन दिंड्यांनी आळंदीकडे प्रस्थान केले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधीस्थळी कार्तिकी एकादशी सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी दरवर्षी या दिंड्या पायी आळंदीला जातात. पेरणे येथील सिध्देश्वर प्रासादिक दिंडी तसेच शिरूर-हवेली प्रासादिक दिंडीतील वारकर्यांनी पेरणेफाटा येथे विसावा व अल्पोहार घेऊन आळंदीकडे प्रस्थान केले. या दिंडीत पेरणे, कोरेगाव भीमा, वढु बुद्रुक, आपटी, डिंग्रजवाडी, वढु खुर्द तसेच लोणीकंद परिसरातील अनेक वारकरी सहभागी होतात. या दिंड्यांचे पेरणेफाटा, वढु खुर्द, फुलगाव, तुळापूर या गावांसह ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
कोरेगाव भीमा येथील दत्त मंदिरातून प्रस्थान झालेल्या शिरूर-हवेली प्रासादिक दिंडीत प्रामुख्याने अशोक घावटे , रावसाहेब फडतरे ,अर्जुन गव्हाणे , केशव फडतरे , नितीन ज्ञानेश्वर गव्हाणे , भाऊसाहेब ढेरंगे , विलास तात्या खांदवे आदींसह अनेक वारकरी सहभागी झाले होते. यात एक महिला वारकर्यांची संख्या लक्षणीय होती. मोठ्या भक्ती भावाने भीमा नदी पार केल्यानंतर पेरणेफाटा येथे बाबुलाल पोटफोडे यांच्याकडे वारकर्यांचे स्वागत व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
तर पेरणे गावातून प्रस्थान झालेल्या पेरणे येथील सिध्देश्वर प्रासादिक दिंडीने पेरणेफाटा येथे विसावा घेत चहापाणी घेतला. यावेळी ईश्वर शिंदे, विलास घावटे, सौ. शोभा शिंदे, सौ. अलका घावटे, सुहास गायकवाड, सौ.रेखा गायकवाड, राजु म्हस्के, देविदास फेंगडे, ऋषिकेश शिंदे, सौ.धनश्री शिंदे ,कौस्तुभ शिंदे यांच्यासह परिसरातील नागरीकांनी मोठ्या भक्ती भावाने विणेकरी व सहभागी वारकऱ्यांचे यथोचित स्वागत करून अल्पोहार दिला.
या दिंडीत हभप बबनराव वाळके, दशरथ वाळके, नवनाथ वाळके, माधुरी वाळके, शिवाजीनाना वाळके, सिताराम वाघमारे आदींसह विणेकरी व ज्येष्ठ वारकरी यात सहभागी झाले होते. अल्पोहार व चहाचा आस्वाद घेतल्यानंतर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा जयघोष करीत दिंडी आळंदीकडे मार्गस्थ झाली.