फुलगाव येथे श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने मोफत सामूहिक विवाह सोहळा मोठया उत्साहात वेळेत संपन्न
सोहळ्यात वधू-वरांना संपुर्ण पोशाखासह मंगळसुत्र व संसारोपयोगी भांडीही भेट

पुणे : भगवान श्री सत्यसाई बाबा
जन्मशताब्दी महोत्सवा अंतर्गत श्री सत्यसाई सेवा संघटना, पुणे यांच्या वतीने फुलगाव येथे १०१ मोफत सामूहिक विवाह सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.

फुलगाव (ता. हवेली) येथे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा व श्री सत्यसाई ग्रामीण सेवा केंद्र परिसरात झालेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात सर्व जातीधर्मासह अंध व अपंग जोडप्यांचाही समावेश होता.
या सोहळ्यात सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशनचे ऑल इंडिया ऑल इंडिया प्रेसिडेंट निमिष पांड्या यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या व त्यानंतर नियोजित वेळेत शुभविवाह संपन्न झाला.

यावेळी ग्लोबल कौन्सिलचे सदस्य रमेश सावंत, सत्यसाई बुक्स अँड पब्लिकेशन ट्रस्टचे विश्वस्त मुकेश पटेल, पश्चिम महाराष्ट्र राज्याध्यक्ष धर्मेश वैद्य, पुणे जिल्हा प्रमुख कॅप्टन गिरीश लेले, हाडशी येथील पांडुरंग क्षेत्राचे संस्थापक शिवाजीराव जाधव, विकास लोलगे, चंद्रकांत गोली, बजरंग माळी, तसेच आमदार बापुसाहेब पठारे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिपदादा कंद, आमदार माऊली कटके यांचे बंधू अनंता कटके, यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, माजी सभापती रोहिदास उंद्रे आदी मान्यवर तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी संयोजक बाळासाहेब वाल्हेकर, राज्य सेवादल सहप्रमुख दिलीप भामे, नॅशनल मेटेनन्स सेवादल कोऑर्डिनेटर रामु ईटिकला, वेंकटेश जालगी, नितिश श्रीवास्तव, कौस्तुभ खांदवे, फुलगाव समिती प्रमुख सुनिल वागस्कर, सेवादल प्रमुख शंकरराव वागस्कर आदींसह सर्व समिती प्रमुख आणि महिला व पुरुष सेवादल व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
या विवाह सोहळ्यासाठी माजी आमदार दिपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा प्रतिष्ठान संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस विदयालयाचीही मोठी मदत झाली. विवाह सोहळ्यात वधू-वरांना संपुर्ण पोशाखासह मंगळसुत्र तसेच संसारोपयोगी भांड्यांचा संचही देण्यात आला.
…………..



