पिंपळे जगताप सोसायटीच्या चेअरमनपदी धनंजय वामनराव थिटे यांची बिनविरोध निवड
सभासद व संस्थेचे हित जपून प्रभावी काम करणार - चेअरमन धनंजय थिटे
पुणे : पिंपळे जगताप (ता. शिरुर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी धनंजय वामनराव थिटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पिंपळे जगताप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची निवड प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. यात चेअरमनपदासाठी धनंजय वामनराव थिटे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडप्रक्रियेसाठी निवडणुक निर्णय अधिकारी रमेश वाळुंज व सचिव प्रशांत कुंभार यांनी काम पाहीले. निवडीनंतर ग्रामदैवत धर्मराज मंदीरात दर्शन घेवून थिटे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील अनेक आजी – माजी पदाधिकारीही उपस्थित होते. शेतकरी सभासदांना शासकीय योजनांची माहिती तसेच लाभ मिळवून देणे तसेच सभासद व संस्थेचे हित जपून प्रभावी काम करणार असल्याचे धनंजय थिटे यांनी निवडीनंतर सांगितले.
……..