कोलवडी सोसायटीच्या चेअरमनपदी बबनराव गायकवाड तर व्हाईस चेअरमनपदी सौ.मनिषा घुमे बिनविरोध
संस्था व सभासदांच्या हितासाठी प्रभावी काम करण्याचा निर्धार
पुणे : पूर्व हवेलीतील महत्वपूर्ण अशा कोलवडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच बबनराव भानुदास गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी सौ.मनिषा राजेंद्र घुमे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी अध्यक्ष गिरीष पवार यांनी अध्यक्षपदाचा तर संतोष मुरकुटे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे निवडणूक घेण्यात आली. यावेळी बबनराव गायकवाड यांची अध्यक्षपदी तर सौ.मनिषा राजेंद्र घुमे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली. श्रीमती देसाई यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
याप्रसंगी यशवंत साखर कारखान्याचे माजी संचालक तुकाराम पवार, सोसायटीचे माजी अध्यक्ष सुभाष उंदरे, यशवंत कामगार संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, माजी सदस्य आनंदा भालसिंग, शामरान शितोळे, दत्तात्रय उंदरे,बाळासाहेब खळेकर, माजी संचालक अर्जुन मदने, माजी अध्यक्ष बाजीराव भालसिंग आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संस्था तसेच सभासदांच्या हितासाठी अधिक प्रभावी काम करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सांगितले.