वाघोलीत ‘सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स मध्ये ‘दो धागे सीतामाई के लिए’ उपक्रमात सहभागाची संधी
वाघोलीच्या सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्समध्ये सीतामार्ईसाठी हातमागावर साडी विणण्याची संधी
पुणे : अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिरात सीतामाईला परिधान करण्याच्या साडीत दोन धागे विणण्याची संधी पुण्यातील मित्तल परिवाराने त्यांच्या वाघोली येथील प्रशस्त सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्समध्ये उपलब्ध करून दिली आहे.
पुणेकर भाविकांच्या सहभागातून वाघोली येथे नगर हमरस्त्यालगत सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्समध्ये सध्या हातमाग यंत्रावर साडी विणण्यासाठी श्रीराम भक्तांची गर्दी होताना दिसत आहे.
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभरात मोठ्या उत्साहात तयारी सुरु आहे. तशीच तयारी पुण्याच्या वाघोलीत देखील सुरु आहे.
प्रभू श्री राम मंदिरात सीतामाईला परिधान करण्याच्या साडीत दोन धागे विणण्याची संधी पुण्यातील मित्तल परिवाराने त्यांच्या वाघोली येथील प्रशस्त सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्समध्ये
यांच्यातर्फे वस्त्र विणण्यात येत आहे. त्यासाठी कारागिरासह हातमाग यंत्र देखील वाघोलीत सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स मध्ये उभारण्यात आलं आहे. सहा जानेवारीपासून सुरु झालेला हा उपक्रम येत्या १४ जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार असून या कालावधीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हातमागावर सीतामाईला परिधान करण्याच्या साडीत दोन धागे विणण्याची संधी मिळणार आहे.
आपण सर्वजण मिळून पुण्य कमावण्याच या दिव्य उपक्रमात सहभागी होवूया, असे विनम्र आवाहन सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्सच्या मित्तल परिवाराने केले आहे.
…………