पुण्यातील मोशी येथे आंतरराष्ट्रीय किसान कृषी प्रदर्शनास उत्फुर्त प्रतिसाद

हे प्रदर्शन रविवार (ता.१७) पर्यत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे सुरू राहणार

पुणे : भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन ‘किसान’ कृषी प्रदर्शनास बुधवार (ता. १३) पासून सुरूवात झाली. हे प्रदर्शन रविवार (ता.१७) पर्यत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे सुरू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्‌घाटन बुधवारी सकाळी ९ वाजता प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात आले.

      सुमारे १५ एकर क्षेत्रावरील या प्रदर्शनात ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहेत. प्रदर्शनाच्या पाच दिवसांत  देशभरातून सुमारे एक लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.  यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व  शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शनही खुल्या जागेत केले आहे.

      मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात अनेक नवीन संकल्पना मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांच्या नवकल्पनांना व नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी ‘स्पार्क’ हे दालनही उभारण्यात आले आहे.

५०,००० हुन अधिक शेतकऱ्यांनी केली पूर्वनोंदणी :

प्रदर्शनासाठी मोबाईल ॲपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. याद्वारे ३०,००० हुन अधिक शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली असून ही संख्या वेगात वाढत आहे.

———–

प्रदर्शकांची माहिती व संपर्क :

किसान मोबाईल ॲपवर सहभागी कंपन्या व त्यांच्या उत्पादनांची माहिती उपलब्ध असल्याने नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा प्रदर्शक संस्थांशी प्रदर्शनाच्या आधीपासूनच संवाद सुरु झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button