गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुपुष्यामृत योगात सोन्यात गुंतवणूक – सुवर्णसंधी!
गिरीराज’ ज्वेलर्सच्या सुवर्णदालनांमध्ये वैविध्यपुर्ण दागिने खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह

पुणे : सध्या सोनं ही केवळ दागिन्यांची शोभा नसून सुरक्षित गुंतवणुकीचं प्रभावी माध्यम आहे, हे आपण सर्वजण जाणतो. सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याच्या दरात चढ-उतार दिसत असले, तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं नेहमीच फायदेशीर ठरतं. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, चलनवाढ आणि शेअर बाजारातील अनिश्चितता यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे सोनं हे “सुरक्षित गुंतवणुक’ म्हणुन मानलं जातं.
याच अनुषंगाने, येणारा गुरुपुष्यामृत योग हे सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. हिंदू पंचांगानुसार गुरु (बृहस्पती) आणि पुष्य नक्षत्राचा संगम झालेला दिवस अत्यंत शुभ व मंगलकारी मानला जातो. या दिवशी सोनं खरेदी केल्यास समृद्धी, स्थैर्य व सौख्य लाभते, अशी दृढ श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक ग्राहक वर्षभर या मुहूर्ताची वाट पाहत असतात.
व्यवसायिक दृष्टिकोनातूनही, हा दिवस ज्वेलर्स व्यावसायिकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरतो. ग्राहकांची वाढती गर्दी, खास सवलती, नवीन कलेक्शनचा शुभारंभ यामुळे बाजारात एक उत्सवी वातावरण निर्माण होतं. सोनं हे केवळ अलंकार नसून, काळाच्या कसोटीत टिकणारी संपत्ती आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने आणि धार्मिक परंपरेनुसारही, गुरुपुष्यामृत योगात सोनं खरेदी करणं ही एक सुवर्णसंधीच ठरते.

ऐनवेळी सोन्याचीच गुंतवणुक मदतीला येत असल्यानेही सोनेखरेदीकडे महिलांचा वाढता कल…
लग्नसमारंभात तर सोने हवेच, मात्र अडीअडचणीच्या प्रसंगीही ऐनवेळी सोन्यांचीच गुंतवणुक कामी येत असल्याचे अनेक भगिनींचे अनुभव आहेत, त्यामुळे पुन्हा भविष्यात ऐनवेळी कामी येणारी गुंतवणुक म्हणून सोनेखरेदीकडेच महिलांचा कल वाढत असल्याचा प्रत्यय ‘गिरीराज’ ज्वेलर्सच्या प्रत्येक शोरुममध्ये येत असल्याचे श्री. साेनी यांनी सांगितले.
‘गिरीराज’ ज्वेलर्स’मध्ये आकर्षक दागिने खरेदीचा फायदा…
BIS-HUID प्रमाणित आकर्षक दागिन्यांचे निर्माते तसेच वैविध्यपुर्ण दागिने खरेदीसाठी विश्वासू पेढी असलेल्या सुप्रसिद्ध ‘गिरिराज’ ज्वेलर्स परिवाराकडून दरवर्षी ग्राहकसेवेसाठी विविध योजना आणल्या जातात. यापुर्वीच्या हॉलमार्कसह ‘शुन्य टक्के लॉस ‘ म्हणजेच कोणताही तोटा न होता ‘जुनं सोनं दया, नवं सोनं घ्या’ या किफायतशीर योजनेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. तर सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, यंदाच्या गुरुपुष्यामृत योगामुळेही विविध दागिने खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे.

ग्राहकांची गरज ओळखून नगर रस्त्यावर वाघोली, कोरेगाव भीमा येथे ‘गिरिराज ज्वेलर्स’ची तर खराडीत गजलक्ष्मी तसेच पुणे येथे लक्ष्मी ज्वेलर्स’ची प्रशस्त दालने महिला वर्गाचे आकर्षण ठरत आहेत. या दालनांमध्ये आधुनिक फॅशन्सचे विविध डिझाईन्सच्या दागिन्यांसह डायमंड दागिन्यांच्याही अनेक व्हरायटीज तसेच गणरायासाठीही चांदीचे आकर्षक विविध दागिने माफक दरात उपलब्ध आहेत.
तर राशीनुसार अंगठ्यांमध्ये राशी खडे परिधान करणाऱ्या ग्राहकांनाही आता गिरीराजच्या सर्व पेढ्यात विविध राशी खडे व सर्टीफाईड मौल्यवान रत्ने उपलब्ध आहेत. सराफी व्यवसायातील प्रदिर्घ अनुभव, तसेच ग्राहक देवो भंव’ या विचारातून विश्वासार्ह सेवा यामुळे ‘गिरिराज’ परिवाराने अल्पावधितच ग्राहकांचा विश्वास जपला आहे.
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, यंदाचा गुरुपुष्यामृत योग तुमच्या घरात आणि गुंतवणुकीत सुवर्णप्रभा घेऊन येवो, हीच शुभेच्छा !
—



