नवव्या सीबीएसई क्लस्टर क्रिडास्पर्धांना बुधवार (ता.६) पासून पुणे (लोणीकंद) येथे श्री रामचंद्र शैक्षणिक संकुलात सुरुवात होणार
शनिवारी (ता. ९) प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण

पुणे : महाराष्ट्र आणि गोवा प्रदेशातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) द्वारे आयोजित नवव्या सीबीएसई क्लस्टर क्रिडा स्पर्धांना बुधवार (ता.६) पासून पुणे (लोणीकंद) येथे श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू टाइम स्कूलच्या प्रांगणात सुरुवात होणार आहे.
श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम.आर.भूमकर तसेच संचालक मंडळाच्या पुढाकाराने सीबीएसई शालेय विद्यार्थ्यांच्या या तीन दिवशीय बॅडमिंटन तसेच तायक्वांदो क्रीडा स्पर्धां आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
या स्पर्धांचा शुभारंभ ६ ऑगस्टला तंत्र व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व तसेच आमदार योगेश टिळेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) प्रदीप कंद, पुणे शहर भाजपाचे सचिव गणेश कळमकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर व संस्था प्रमुख मारुती रामचंद्र भूमकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता होणार आहे.
तर शनिवारी (ता. ९) क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच संस्था प्रमुख मारुती रामचंद्र भूमकर, सचिव पांडुरंग भूमकर, खजिनदार अथर्व भूमकर, सह खजिनदार स्वप्निल भुमकर, संचालक गौरव भूमकर, प्राचार्य रितिका नायडू आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
या सीबीएसई शालेय क्रिडा स्पर्धेमध्ये बॅडमिंटनसाठी महाराष्ट्र, गोवा राज्यांतील तर तायक्वांदो साठी पुणे, बेंगलूरू, तिरुअनंतपूरम, केरळ राज्यातील विद्यार्थी खेळाडू तसेच प्रशिक्षकांसह सुमारे ३००० जण सहभागी होणार असल्याची माहिती प्राचार्या रितीका नायडू यांनी दिली.
क्षेत्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर शालेय खेळाडूंचे क्रीडा नैपुण्य वाढवण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरणार आहेत. श्री रामचंद्र शैक्षणिक संकुलात सोसायटीचे संस्थापक प्रमुख मारुती रामचंद्र भूमकर यांच्या पुढाकाराने यापूर्वीही या शैक्षणिक संकुलात सुसज्ज सुविधांसह विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.…………



