शिरूर तालुका आरपीआयतर्फे शौर्यदिनानिमित्त उल्लेखनीय सेवेसाठी मान्यवरांचा सन्मान
प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व पत्रकारांचा RPI अध्यक्ष नवनाथ कांबळे यांच्याकडून सन्मान
पुणे : कोरेगाव भीमा (पेरणेफाटा, ता. हवेली) येथील शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व पत्रकारांचा शिरूर तालुका आरपीआयच्या वतीने त्यांच्या कार्यालयात जाऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी मा. जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे; मा. संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण; मा. रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण; मा. सोमय्या मुंडे, पोलीस उपायुक्त, पुणे शहर परिमंडळ ७; मा. अविनाश शिळीमकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एलसीबी पुणे; तसेच मा. सर्जेराव कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन यांचा सन्मान करण्यात आला.

याशिवाय पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मा. शरद पाबळे, अध्यक्ष मराठी पत्रकार संघ; मा. नागनाथ शिंगाडे (दै. सकाळ); मा. मयूर भुजबळ (दै. प्रभात) आणि मा. उमेश काळे (दै. पुढारी) यांनाही सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, फेटा व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. या सन्मान उपक्रमाचे प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांसह विविध मान्यवरांनी ही कौतुक केले. तसेच या सन्मानामुळे काम करण्याची प्रेरणा वाढत असल्याचेही नमूद केली

शिरूर तालुका आरपीआयचे अध्यक्ष नवनाथ कांबळे यांच्या पुढाकाराने झालेल्या या सन्मान समारंभास उद्योजक नवनाथ भुजबळ, राजेंद्र केदारी व उमेशराव भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
शौर्यदिनानिमित्त लाखो अनुयायांच्या अभिवादनावेळी सुव्यवस्था, सुरक्षितता व समन्वय राखण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व पत्रकारांचे मोठे योगदान असते.तसेच शिरूर तालुका आरपीआयच्या वतीने ही येणाऱ्या अनुयायांचे स्वागत, सोई सुविधा तसेच हजारो अनुयायांना अन्नदानाचीही व्यवस्था करण्यात येते. त्यासाठी प्रशासनालाही मोठी मदत आरपीआयचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते करत असतात.

शौर्यदिन कार्यक्रमादरम्यान केलेल्या प्रभावी कार्याबद्दल सर्व सन्मानितांचे यावेळी कौतुक करण्यात आल्याचे तसेच दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शिरूर तालुका आरपीआयचे अध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी सांगितले.
…………..



