वाघोलीत सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुमधूर संगीत मैफिलीने श्रोते मंत्रमुग्ध
ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशन मार्फत ‘दिवाळी पाडवा पहाट’ कार्यक्रम उत्साहात संपन्न.
पुणे : वाघोलीत ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशनतर्फे आयोजित दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुमधूर संगीत मैफिलीने श्रोते मंत्रमुग्ध झाले. फाऊंडेशनतर्फे गेली सात वर्षे सुरु असलेला हा दिवाळी पाडवा पहाट – २०२३ कार्यक्रम यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवरही कार्यक्रमाला उपस्थित होते.
वाघोली येथे बाजारतळ मैदानावर आयोजित या संगीतमय मैफलीला पहाटे ५:३० पासूनच रसिक श्रोत्यांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, सुप्रसिद्ध गायक स्वप्निल गोडबोले, सुप्रसिद्ध गायिका राधा खुडे, सुप्रसिध्द गायक चंद्रशेखर महामुनी यांनी आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. वाघोली परिसरातील असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून या संगीत मैफिलीचा आनंद घेतला.
यावेळी शिरुर बाजार समिती व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती पै. मंगलदास आप्पा बांदल यांनी मनोगत व्यक्त करताना माऊलीआबा कटके यांनी सामाजिक बाधिलकीची जाणीव ठेवून नागरीकांसाठी राबविलेल्या पाडवा पहाट, नवरात्र, गणेशोत्सव, तीर्थयात्रा दर्शन, तसेच विद्यार्थी, महीला व युवावर्गासाठी उपक्रमांचे कौतुक करीत आबांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्वांना दिवाळी शुभेच्छा व उपस्थितांचे आभार व्यक्त करताना माऊली आबा कटके म्हणाले की, दीपावलीनिमित्त सर्वांनी एकत्र येऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, या उद्देशाने दिवाळी पाडव्यानिमित्त गेली सात वर्षे संगीतमय सुरांची सुरेल मैफल आयोजित केली जाते. सामान्य नागरीक, महिला, विद्यार्थी, कामगारासंह सर्व घटकांसाठी आयोजित या उपक्रमात फौडेशनच्या सर्व सदस्यांचे मोठे योगदान असते. या प्रसंगी शिरूर – हवेलीतील शिवसेना – युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना, पदाधिकारी, शाखाप्रमुख ,उपशाखाप्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.