कोरेगाव भीमा येथे भीमा नदीतिरी छठपुजेला उत्स्फुर्त प्रतिसाद
जनकल्याण सोशल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजन
पुणे : कोरेगाव भीमा, सणसवाडी (ता. शिरूर) तसेच हवेलीतील पेरणे, लोणीकंद परिसरातील उत्तर भारतीय बंधू-भगिनींकडून भीमा नदीतीरी मोठ्या उत्साहात छठ पुजन करण्यात आले. मोठ्या संख्येने आलेल्या उत्तर भारतीय बांधवांमुळे भीमानदीकाठ फुलून गेला होता.
औद्योगिक वसाहतीमुळे नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा, सणसवाडी (ता. शिरूर) तसेच पेरणेफाटा, लोणीकंद, वढु परिसरात नोकरी व्यवसायानिमित्त मोठ्या संख्येने आलेले उत्तर भारतीय बांधव रहात असून जनकल्याण सोशल ट्रस्टच्या माध्यमातून ते वेगवेगळे सण तसेच सामाजिक उपक्रमही सातत्याने राबवतात.
छट पुजेनिमित्त जनकल्याण सोशल ट्रस्टच्या पुढाकाराने सलग सहाव्या वर्षी भीमा नदीतीरी सुर्यदेव व छठ माता यांची पुजा म्हणजेच छठपुजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उत्तम आरोग्य व दिर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करुन प्रसाद वाटपही करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, घोडगंगाचे माजी संचालक कैलासराव सोनवणे, कोरेगावचे सरपंच विक्रम गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, विजय गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य केशवराव फडतरे, संपतराव गव्हाणे, नवनाथ यनभर, नवनाथ गव्हाणे, योगेश दरेकर, आप्पासाहेब दरेकर, प्रवीण दरेकर, खंडू तांबडे, उमाकांत हरगुडे, विकास दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हिंदी, मराठी, मैथिली व भोजपुरी गींतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान छटपुजेदरम्यान उत्तर भारतीय बंधूंनी एकत्र येत भीमा नदीघाट परिसरही स्वच्छ केला. या कार्यकमासाठी जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशकुमार सिंह, उपाध्यक्ष शैलेन्द्र कुमार सिंह, सचिव रविशंकर सिंह, खजिनदार चंद्रभूषण कुंवर, सुरेंद्र उपाध्याय, राकेश सिंह, संतोष सिंह, नंदलाल गुप्ता, शंकर चौधरी, अजय सिंह, राजेश सिंह, रोहित पटेल, रमन कुंवर, ललित ठाकुर, कौशलेंद्र सिंह, चंदन सिंह, विकास सिंह, कौशल ओझा, राजबहादुर चौबे आदी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.