पिंपळे जगताप येथे दीपोत्सवाने उजळले ग्रामदैवत धर्मनाथ मंदिर

कै.संजय जगताप प्रतिष्ठान व जनसेवा ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून १६ वर्षे उपक्रम

पुणे : पिंपळे जगताप (ता. शिरूर) : येथे दीपावलीच्या प्रकाश पर्वात गावातील युवा ग्रामस्थांनी केलेल्या दीपोत्सवामुळे ग्रामदैवत धर्मनाथ महाराज मंदीर दिवाळी पाडव्याला अक्षरश: उजळून निघाले. गेली १६ वर्षे हा उपक्रम राबवला जात आहे. 

      दिवाळी’ हा उत्साह, चैतन्य आणि आनंदाचा त्याचप्रमाणे दिव्यांचा, तेजाचा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिपोत्सव आहे. दीपावलीच्या या प्रकाशपर्वात घर व अंगणात दिवे लावल्याने अंध:कार नाहीसा होवून सर्व वातावरण प्रकाशमय व प्रसन्न होते. मंदीर व आपला गावपरिसरही असाच प्रकाशमय व्हावा, या उद्देशाने ग्रामस्थांच्या सहभागातून मंगळवारी दिवाळी पाडव्यानिमित्त केलेल्या दीपोत्सवाने पिंपळे जगताप येथे ग्रामदैवत धर्मनाथ महाराज मंदिरही उजळून निघाले. 

      पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे कै.संजय जगताप प्रतिष्ठान व जनसेवा ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून संस्थाप्रमुख धनंजय जगताप यांनी पुढाकार घेत पाडव्याच्या मुहूर्तावर राबविलेल्या या उपक्रमात मंदीर परिसरात नऊ हजार दिवे लावण्यात आले. या उपक्रमात स्थानिक पदाधिकारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. मंदीरात रांगोळीचे सुंदर रेखाटन श्रुती दिपक जगताप व गौरी निलेश फडतरे यांनी केले.

        या प्रसंगी धनंजय जगताप, शरदराव पाबळे, पोलीस पाटील वर्षा थिटे, किशोर जगताप, संदीप जगताप, प्रमोद निकम, निखिल बेंडभर, अशोक जगताप, शामराव बेंडभर, अरुण जगताप, निलेश फडतरे, प्रताप जगताप, मोहन वाडेकर, गणेश जगताप, सुरज शेळके, दीपक सोंडेकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. धर्मनाथ महाराजांच्या महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

———————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button