राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती कोरेगावात उत्साहात साजरी
फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट स्कूलमध्ये प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट स्कूलमध्ये बारा जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान Swami Vivekananda यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला Rajmata Jijabai व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पुजन केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, उपाध्यक्ष प्रकाश खैरमोडे, सचिव दिलीप भोसले, संचालक शंकर गव्हाणे, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सैंदाणे, उपमुख्याध्यापिका अजिता नायर तसेच वैशाली धर्माधिकारी, श्रीमंत प्रताले आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सचिव दिलीप भोसले यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या आदर्श मातृत्वाचा व शिवरायांच्या घडणीत त्यांनी दिलेल्या संस्कारांचा इतिहास प्रभावी शब्दांत मांडला. तर स्वामी विवेकानंद यांनी युवकांसाठी घालून दिलेल्या मूल्यांचा, आत्मविश्वासाचा आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या विचारांचा गौरव अध्यक्ष राजाराम ढेरंगे यांनी आपल्या भाषणातून केला.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांच्या विचारांची प्रेरणा मिळाली असून, उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



