श्रीक्षेत्र वढु बुद्रुक येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज समाधीस्थळ परिसर दीपोत्सवात उजळला

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व श्रीक्षेत्र वढु बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन

पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र वढु बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज समाधीस्थळी हजारो दिवे लावून आतिषबाजी व रोषणाईसह दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी “स्वर साधना भजनी मंडळाच्या भाव गीतांनी व हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. तर हजारो दिव्यांच्या प्रकाशात समाधीस्थळ परिसरही झळाळून निघाला.

  1. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व श्रीक्षेत्र वढु बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी शिवप्रतिष्ठानचे धारकरी व शिवशंभूभक्तनी ३००१ दिवेप्रज्वलित करीत मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा केला. यावेळी आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने समाधीस्थळी सजावटही करण्यात आली होती. यावेळी “स्वर साधना भजनी मंडळाच्या भाव गीतांनी व हरिनामाच्या गजराने या दिपोत्सवाला सुरेल सुरांचीही साथ लाभली. यावेळी शोभेची आतिषबाजीही करण्यात आली. दीपोत्सवासाठी पंचक्रोशीतील विविध गावचे धारकरी व प्रमुख मान्यवरही उपस्थित होते.

……..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button