साईबाबा पालखीचे लोणीकंद येथे भूमकर परिवाराकडून स्वागत
परिसरातील भाविकांची साई दर्शनासाठी मोठी गर्दी
पुणे : साईभजन साईगीते म्हणत उत्साहाने पुण्याकडून शिडींकडे जाणाऱ्या साईबाबा पालखीचे लोणीकंद व कोरेगाव भीमा येथे भक्ती भावाने स्वागत करण्यात आले.
पुण्याहून निघालेल्या साईबाबा पालखीचे लोणीकंद (ता. हवेली) येथे भुमकर परिवाराकडून स्वागत करण्यात आले. यावेळी भुमकर परिवाराने मोठ्या भक्तिभावाने साईपालखीचे पुजन करीत साईभक्तांना फराळाची व्यवस्था केली. यावेळी भुमकर परिवाराचे सदस्य तसेच परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते. तर कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे फडतरे परिवाराच्या वतीने साईपालखीचे मंगलमय वातावरणात स्वागत व पुजन करीत साईभक्तांना दुपारच्या जेवणाची व्यवस्थाही केली. यावेळी फडतरे परिवारासह उपस्थित परिसरातील पदाधिकारी व भाविकांनी साई दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. विसाव्यानंतर पालखी शिक्रापुरकडे मार्गस्थ झाली. लोणीकंद तसेच कोरेगाव भीमा येथे साईबाबा पालखी सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान भुमकर व फडतरे परिवाराच्या वतीने करण्यात आला.
दरवर्षी लोणीकंद येथे साईबाबा पालखी व भाविक भक्तांचे स्वागत व सेवा करण्याची संधी आमच्या भुमकर परिवाराला मिळत असल्याचे समाधान असून साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने भाविक लोणीकंद येथे येत असल्याचे यावेळी श्रीरामचंद्र शिक्षण संस्थेचे प्रमुख व उद्योजक बापूसाहेब भुमकर यांनी सांगितले.
……….