तूतारी फुंकत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या पुनर्विजयाचा कोरेगाव भीमा येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष, एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी केला आनंद व्यक्त

एकमेकांना पेढे भरवत व गुलाल उधळून व फटाके वाजवून केला विजय साजरा

पुणे : शिरुर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या पुनर्विजयाचा शिरूर तालुक्याचे प्रवेशव्दार असलेल्या कोरेगाव भीमा येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी एकमेकांना पेढे भरवत गुलाल उधळून व फटाके वाजवून विजयाचा आनंद साजरा केला.

सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे विजयाची निर्णायक आघाडी घेत दुसऱ्यांदा खासदारपदी विराजमान होत असताना शिरूर तालुक्याचे प्रवेशव्दार असलेल्या कोरेगाव भीमा येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी एकमेकांना पेढे भरवत गुलाल उधळून व फटाके वाजवून विजयाचा आनंद द्विगुणित केला.

वढू बुद्रुक चौकासह ठिकठिकाणी आज दिवसभर निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्तेत चौका चौकात मोबाईलवर निकालाचा आढावा घेत गटा-गटाने थांबलेले होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी सुमारे एक लाखाची विक्रमी मतांची विजयी आघाडी घेताच कोरेगाव भीमा येथे कार्यकर्त्यांनी तुतारी व वाद्य वृंदाच्या निनादात एकमेकांना पेढे भरवून आनंदाने विजयाचा जल्लोष व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच महिला भगिनीही या विजयोत्सवात उत्साहात सहभागी झाल्या होत्या. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य पी.के.आणा गव्हाणे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, विकास सोसायटीचे संचालक अशोक काका गव्हाणे, माजी सरपंच बाळासाहेब फडतरे, विद्यमान सरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन बबुशा ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे, महादेव फडतरे, ग्रामपंचायत सदस्या वंदना गव्हाणे, मीना ढेरंगे, कुंदाताई फडतरे, शिवसैनिक दत्तात्रय वारघडे, कौस्तुभ होळकर , अरविंद गव्हाणे, राहुल ढेरंगे, संतोष काशिद, सुरेंद्र भांडवलकर , सुनिल बच्चु गव्हाणे, नितिन गव्हाणे, दिलीप कांबळे, शांताराम फडतरे, आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

……………

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button