श्रीक्षेत्र तुळापूरचे माजी सरपंच नवनाथ शिवले यांच्या वतीने ५० हजार भाविकांना फराळ वाटप
परिसरातील विकास तसेच नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार - नवनाथ शिवले

पुणे : श्रावण मासानिमित्त श्रीक्षेत्र तुळापूर येथील माजी सरपंच नवनाथ शिवले मित्र परिवाराच्या वतीने परिसरातील गावातील नागरिकांना तसेच महादेव मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी फराळासह ५० हजार राजगिरा लाडू वाटप व केळी वाटप करण्यात आले.

यामध्ये निरगुडी, वडगाव शिंदे, भावडी, तुळापूर, फुलगाव, वढू, लोणीकंद, पेरणे, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, बकोरी तसेच केसनंद आदी गावांचा समावेश होता.
माजी सरपंच नवनाथ शिवले यांचा निरगुडी, वडगाव शिंदे, भावडी, तुळापूर, फुलगाव, वढू, लोणीकंद, पेरणे, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, बकोरी तसेच केसनंद आदी गावपरिसरात प्रभावी जनसंपर्क असून या परिसरातील विकास तसेच नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे नवनाथ शिवले यांनी सांगितले.




