लोणीकंद पोलिसांकडून जेसीबीच्या सहाय्याने धडाकेबाज कारवाईत अवैध हातभट्टया उध्वस्त
अवैध व्यवसायांबद्दल गोपनियतेने माहिती देण्याबाबत लोणीकंद पोलीसांचे जनतेला आवाहन
पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याअंतर्गत पेरणे पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रात पेरणे हद्दीतील कोळपे वस्ती, पेरणे बकोरी शिवलगत ओढयाच्या कडेला तसेच भावडी गावातील बोरकर वस्तीतील अवैध दारु धंद्यांवर लोणीकंद पोलीसांची जेसीबीच्या सहाय्याने धडाकेबाज कारवाई करीत हातभट्ट्या उध्वस्त केल्या. या कारवाईत १ लाख ९ हजार ४०० रुपयांचे साहीत्य उध्वस्त करुन संबंधित हातभट्टी चालकाविरुद्ध गुन्हेही दाखल केले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे बंद करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार लोणीकंद पोलिसांनी कार्यक्षेत्रात शोध घेत अवैध धंद्यांवर कारवाया सुरु केल्या. त्यानुसार गोपनीय बातमीच्या आधारे गुरुवारी (ता. ८) लोणींकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, बाळासाहेब सकाटे, श्री. रोकडे, श्री. सपुरे, श्री. कोकरे यांचे एक पथक तसेच पेरणे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, तपास पथकातील श्री. फरांदे, श्री.साळुंके, श्री. जाधव असे पथक तयार करुन त्यांना वाघोली पोलीस चौकीचे हद्दीत ग्रामीण भागातील डोंगराळ व दुर्गम भागातील ओढे व नदीलगत चालु असणा-या हातभट्टयांवर गोपनीय ऑपरेशनसाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी विशेष कार्य दल तयार केले. यात पेरणे चौकीचे अधिकारी निलेश घोरपडे व तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे यांच्या पथकाने पेरणे गावचे हद्दीत कोळपे वस्ती, पेरणे बकोरी शिवेलगत ओढयाच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत गुळमिश्रीत रसायनचा वापर करुन हातभट्टी लावुन गावठी दारु तयार करणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकुन ६० हजार ६०० रुपये किंमतीचे गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कच्चे रसायन, तयार गावठी दारु ही जेसीबीच्या साहय्याने उध्वस्त केले. या कारवाईत माधुरी रमेश परदेशी (वय ४० वर्ष, रा. कोळपे वस्ती, पेरणे, ता. हवेली) यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावडी गावातील बोरकर वस्ती या ठिकाणी गुळ मिश्रीत रसायनांचा वापर करुन दारू तयार करीत असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व पथकाने या ठिकाणी छापा टाकुन एकुण ४८ हजार ८०० रुपये किंमतीचे गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कच्चे रसायन, तयार गावठी दारु ही जेसीबी च्या साहय्याने उध्दव करुन साहिल संजय राजपुत, (वय २५ वर्ष, बोरकर वस्ती, भावडी, पुणे) याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी परिमंडळ ४चे पोलीस उपआयुक्त विजय मगर, येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, सपोनि रविंद्र गोडसे, सपोनि निलेश घोरपडे, पोउपनि राहुल कोळपे, सपोफौ बाळासाहेब सकाटे, पोलीस अंमलदार कैलास साळुंके, स्वप्निल जाधव, अजित फरांदे, साईनाथ रोकडे, मल्हारी सपुरे, दिपक कोकरे, अजित कारकुड, विठ्ठल केदारी, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली.
अवैध व्यवसायांबद्दल गोपनियतेने माहिती देण्याबाबत लोणीकंद पोलीसांचे जनतेला आवाहन…
पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशन हददीमध्ये कोठेही अवैध धंदे चालू असल्यास त्याबाबत नागरीकांनी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या मो.नं.९५२७०६९१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवले जाईल, असे आवाहन लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी जनतेला केले आहे.