घोड व चासकमान प्रकल्पांच्या सुधारणा संदर्भात आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासमवेत घेतली बैठक

घोड व चासकमान या दोन्ही प्रकल्पाच्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा

पुणे : घोड व चासकमान प्रकल्पांच्या सुधारणा, देखभाल व दुरुस्तीबाबत कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने घोड आणि चासकमान प्रकल्पांच्या सुधारणा व देखभाल कार्यात गती येणार असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही अधिकाधिक फायदा मिळणार असल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.

     बैठकीतील महत्व घोड प्रकल्पाच्या सुधारणा बाबत अनेक विषयांवर चर्चा झाली. यामध्ये धरणातील गाळ हटवण्याची मागणी आमदार कटके यांनी केली. घोड प्रकल्प 1960 साली पूर्ण झाल्याने आता त्याला 60 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. गाळ सर्वेक्षण अहवालानुसार धरणात सुमारे 1 टीएमसी गाळ साठलेला आहे. त्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी हा गाळ काढण्याची मागणी आमदारानी केली. शासन स्तरावर याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे कार्यकारी संचालकांनी सांगितले.

     कालव्यांची दुरुस्ती करावी–घोड प्रकल्पाच्या कालव्यांची सध्या दुरवस्था झाल्याने त्याच्या दुरुस्तीची गरज असल्याचे आमदारांनी नमूद केले. यावर महाराष्ट्र सिंचन सुधार प्रकल्पांतर्गत 76 कोटी रुपये मंजूर झाले असून, काही महिन्यांतच कालव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याचे कार्यकारी संचालकांनी सांगितले. घोड नदीवरील कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्यांची गळती दुरुस्ती करा  अशासूचना आमदारांनी केल्या. आवश्यक लोखंडी बर्गे देण्यात येतील आणि दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे कार्यकारी संचालकांनी सांगितले. कालव्यातील गाळ काढून पाणी वाहतुकीची क्षमता वाढविण्याची सूचना केल्यानंतर  यांत्रिकी विभागाच्या यंत्र सामग्रीद्वारे हे काम हाती घेतले जाईल, असे कार्यकारी संचालकांनी सांगितले. 

          डिंभे  धरणाच्या उजव्या कालव्याच्या शेवटच्या टप्प्याचे अस्तरीकरण – डिंभे धरणाचा उजवा कालवा 113 किमी लांबीचा असून, त्यातील शेवटच्या 12-13 किमी लांबीत अस्तरीकरण नाही. त्यामुळे कालवा पूर्ण क्षमतेने चालू शकत नसल्याचे आमदारांनी निर्दशनास आणून दिल्या नंतर कार्यकारी संचालकांनी सांगितले की, या कालव्याच्या शेवटच्या भागाच्या काँक्रीट अस्तरीकरणासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला असून, लवकरच त्यास मंजुरी मिळेल. अनधिकृत पाणी उपसा व कालवा फोडनाऱ्यावर कारवाई करा– घोड व डिंभे उजव्या कालव्यांच्या आवर्तना दरम्यान होणारा अनधिकृत पाणी उपसा तसेच कालवा फोडण्याच्या घटनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदारानी केली. यावर कार्यकारी संचालकांनी क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत सक्त सूचना देण्यात येतील, असे सांगितले. तर बैठकीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे घोड आणि चासकमान प्रकल्पांच्या सुधारणा व देखभाल कार्यात गती येणार असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळणार असल्याचे आमदार कटके यांनी सांगीतले.

——————

बैठकीत चासकमान प्रकल्प सुधारणांबाबत झालेल्या चर्चेतील प्रमुख मुद्दे : 

  • अस्तरीकरणासाठी 14 वर्षांनंतर सुप्रमा मंजूर – चासकमान प्रकल्पाच्या अस्तरीकरणाच्या कामासाठी 14 वर्षांनंतर सुप्रमा मंजूर करण्यात आली आहे.  0-72 ते 72-146 किमी अस्तरीकरण मंजुरी प्रक्रियेत–एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत 0-72 ते 72-146 किमी. अस्तरीकरणाच्या कामास मंजुरी मिळणार आहे.   
  • गळती रोखण्याच्या कामांना प्राधान्य – के.डी. ब्रँच कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम मंजूर झाले असून, निविदा प्रक्रिया तातडीने सुरू होईल. शासनाने घेतलेल्या जमिनींच्या मोबदल्यासाठी भू-भाडे देण्याची मंजुरी प्रक्रियाही सुरू आहे. कालव्यातील गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण व स्ट्रक्चरल कामांना प्राधान्याने सुरुवात केली जाईल.
  • आवर्तन टेल-टू-हेड पद्धतीने चालणार – पुढील आवर्तन टेल-टू-हेड पद्धतीने चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी आवश्यक प्रशासकीय यंत्रणा आणि साधनसामग्री पुरवली जाणार आहे. न्हावरे, निर्वी आणि निमोणे शाखांसाठी स्वतंत्र कार्यालये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

—————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
23:44