यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी किशोर उंद्रे यांची बिनविरोध निवड
अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत निवडणुक संपन्न

पुणे : पूर्व हवेलीतील उस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी किशोर शंकर उंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याचे मावळते उपाध्यक्ष मोरेश्वर काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवडणुक घेण्यात आली. अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या संपन्न झालेल्या बैठकीत उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत किशोर उद्रे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने उपाध्यक्षपदी किशोर उंद्रे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, सभापती दिलीप काळभोर, उपसभापती दत्तात्रय पायगुडे, संचालक प्रशांत काळभोर, प्रकाश जगताप, लक्ष्मण केसकर, शशिकांत गायकवाड, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष कांचन, सुनील कांचन, सुशांत दरेकर, शशिकांत चौधरी, विजय चौधरी, ताराचंद कोलते, योगेश काळभोर, मोरेश्वर काळे, अमोल हरपळे, राहुल घुले, रामदास गायकवाड, काळभोर, रत्नाबाई काळभोर, दिलीप शिंदे, मोहन म्हेत्रे, कुंडलिक थोरात आदी उपस्थित होते.
पूर्व हवेलीतील उस उत्पादक शेतकरी व कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने प्रभावी काम करण्याचा प्रयत्न मार्गदर्शक नेते व संचालक मंडळाच्या सहभागातून करू, अशी ग्वाही किशोर उंद्रे यांनी निवडीनंतर दिली. निवडीनंतर विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
………