ग्रामीण भागात सुसज्ज अभियांत्रिकी महाविद्यालय उभे करुन उच्चशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या भुमकर परिवाराचे शैक्षणिक क्षेत्रात कौतुकास्पद योगदान – सौ.रुपाली चाकणकर
लोणीकंद, पुणे येथे श्री रामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयाचा ‘क्षितीज’ वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दिमाखात संपन्न

पुणे : ग्रामीण भागातील युवापिढी पुस्तकी शिक्षणाबरोबरच, व्यवहारी ज्ञान व मैदानी स्पर्धातही सहभाग घेत स्वत:ला सिध्द करीत असल्याची बाब अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी केले.
श्रीरामचंद्र एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीरामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन प्रसंगी त्या बोलत होत्या. सौ. चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी आदर्श सरपंच सुभाष लोणकर, उद्योजक अशोक बारवकर, नगरविकास सहाय्यक आयुक्त सौ प्राची जाधव, उदयोजक विजय भुजबळ तसेच विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान सौ. चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आला. तर विद्यार्थ्यांच्या विविधांगी कार्यक्रम सादरीकरणासह ‘क्षितीज’ हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दिमाखात संपन्न झाला.
याप्रसंगी सौ. चाकणकर पुढे म्हणाल्या, ‘आपला पाल्य उच्चशिक्षित होवून कर्तबगार बनावा, हे प्रत्येक आईवडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी व सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्वत: यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातच परिश्रम घ्यावेत.’ तर ग्रामीण भागात सुसज्ज अभियांत्रिकी महाविद्यालय उभे करुन उच्चशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या भुमकर परिवाराचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.
तर ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करून उच्चशिक्षित करण्यासाठी स्थापन केलेल्या श्रीरामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना सर्वतोपरी पाठबळ असल्याचे सांगून यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचेही समन्वयपुर्वक एकत्र प्रयत्न आवश्यक असल्याचे श्रीरामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव शंकर रामचंद्र भूमकर यांनी सांगितले.
याप्रसंगी श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार उद्धव रामचंद्र भूमकर, सौ.रुपाली शंकर भूमकर, सौ.लक्ष्मी उद्धव भूमकर, सौ.स्वप्नाली संजय भुजबळ, वासुदेव नामदेव कचरे, अशोक रामचंद्र बारवकर, सुभाष लोणकर, नगरविकास सहाय्यक आयुक्त सौ.प्राची रुपेश जाधव, उद्योजक विजय राजाभाऊ भुजबळ, उद्योजक संजय राजाभाऊ भुजबळ, उद्योजक इंद्रजीत सतीश बारवकर, उद्योजक संदेश रवींद्र लोणकर, उद्योजक संकेत विजय सायकर व श्री रामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयचे टेक्निकल डायरेक्टर सिद्धांत शंकर भूमकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री रामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.अविनाश देसाई यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, तर डॉ.सुषमा तायडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. देसाई व डॉ. तायडे यांच्यासह प्रा.डॉ.सागर शिंदे, प्रा.विकास गायकवाड, प्रा.भीमराव बोरुडे, प्रा.डॉ.नीलम कुमार, प्रा.डॉ.वैशाली तुराई, प्रा.दीपाली होडाडे, प्रा.आकाश चौरे, प्रा. बोलाडे, प्रा.गुणावरे, प्रा.पटेल मॅडम तसेच अनिल जमदाडे व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
————————-