जनसेवक संपतआबा गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
वाघोली येथील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

पुणे : सामाजिक कार्यकर्ते, जनसेवक संपतआबा गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली येथील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

दरवर्षी जनसेवक संपतआबा गाडे यांचा वाढदिवस गरजूंना मदत, विद्यार्थ्यांना सहाय्य, वृक्षारोपण अशा विधायक उपक्रमाने साजरा करण्यात येतो. या वर्षीही जनसेवक संपतआबा गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली येथील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्था संचालीत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला देण्यात आले. आवडीचा खाऊ खायला मिळालेली विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

यावेळी झालेल्या शुभेच्छा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संपतआबा यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत अनेक मान्यवरही उपस्थित होते.
………..



