हवेलीत वाघोलीकरांचा आमदार अशोक पवार यांच्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद
पदयात्रेत वाघोलीकर ग्रामस्थ व सोसायट्यांमधील नागरीकांसह महिलांची संख्या लक्षणीय
पुणे : विधानसभा निवडणुक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्या पदयात्रांना हवेलीत वाघोलीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळाला. पदयात्रेत वाघोलीकर ग्रामस्थ व सोसायट्यांमधील नागरीकांसह महिलांची संख्या लक्षणीय होती.
वाघोलीकरांचा हा उत्स्फुर्त प्रतिसाद म्हणजे वाघोली परिसरात आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झालेल्या विकासकामांची पोहोचपावतीच असल्याचे बोलले जात आहे. वाघोली परिसरातील या पदयात्रेत कार्यकर्त्यांनी अशोक पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांना खांद्यावर घेत विजयाच्या घोषणा दिल्या. पदयात्रेत फेटे घालून व हातात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो असलेले कटआउट उंचावत सहभागी झालेल्या महीला भगिनींची संख्याही लक्षणीय होती.
या पदयात्रेत प्रामुख्याने शांताराम कटके, संजय सातव पाटील, राजेंद्र सातव पाटील, कमलाकर सातव पाटील, बाळासाहेब सातव पाटील, कैलास सातव पाटील, राजेंद्र पायगुडे, युवराज दळवी, शिवदास उबाळे, वसुंधराताई उबाळे, अर्चनाताई कटके, जयश्रीताई सातव, मीनाकाकी सातव, विक्रम वाघमारे आदींसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.