महायुतीच्या माध्यमातूनच शिरूर-हवेलीत मोठा निधी, लोकप्रिय योजनांमुळे जनता महायुती सरकारवर खुष – प्रदिपदादा कंद

सामान्य जनतेचे प्रेमच माझा विजय साकारुन परिवर्तन घडवेल - ज्ञानेश्वर कटके

पुणे : महायुती सरकारच्या माध्यमातून शिरूर-हवेली मतदारसंघाच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला असून येत्या काळात शिरूर-हवेलीत भरीव निधीतून अभूतपुर्व विकासाकरिता महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊलीआबा कटके यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदिपदादा कंद यांनी केले.

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या निवडणूक प्रचारार्थ कोरेगाव भीमा येथे गाव भेट दौऱ्यानिमित्त कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी ग्रामस्थांनी मोठा हार घालून कटके यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रदीपदादा कंद, विठ्ठलराव ढेरंगे, गणेश कुटे, अनिल काशिद, नारायणराव फडतरे, रामभाऊ सासवडे, कैलासराव सोनवणे, राहुल पाचर्णे, कुसूमताई मांढरे, रवीबापू काळे, राहुल गवारे, जयेश शिंदे, संपतराव गव्हाणे, केशवराव फडतरे, महेशबापू ढमढेरे, विक्रम गव्हाणे, कांतीलाल फडतरे, संजय काशिद, पै.गणेश काशिद, स्वप्निल ढमढेरे, स्वप्नील गायकवाड, केशवराव फडतरे,संजय फडतरे, रमेश गव्हाणे, मधुकर गव्हाणे, वृषाली गव्हाणे आदींसह अनेक पदाधिकारी, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

कंद पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना सोबत घेवून तीन काेटींचा विकासनिधी कोरेगावला दिला, तसेच तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मतदार संघात सुमारे तीन हजार कोटींची विकासकामे मंजुर करुन आणली, प्रसंगी आमदारकी पणाला लावून नगररोड सहापदरीकरणाचे कामही पुर्ण केले, मात्र कधीही त्याचे श्रेय घेतले नाही. सध्या घोडगंगा बंद असला तरीही शेजारील साखर कारखान्यांद्वारे शेतकऱ्यांच्या उसाची गैरसोय होवू देणार नाही, शासनाच्या लोकप्रिय योजनांमुळे जनता महायुती सरकारवर खुष आहे, तर महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके हेही राष्ट्रीय खेळाडु असून ते कोणत्याही कामात कमी पडणार नाहीत, त्यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन यावेळी कंद यांनी केले.

तर जनतेला आवाहन करताना ज्ञानेश्वर कटके म्हणाले, ‘‘शिरुर हवेलीत गेल्या १० वर्षात रखडलेली विकासकामे, घोडगंगा कारखाना व न सुटलेल्या नागरी समस्या, तसेच खुनशीचे व दहशतीचे वातावरण यामुळे जनतेत मोठी नाराजी व प्रचंड रोष आहे. त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या या लढाईची सुत्रे आता सामान्य जनतेने हाती घेतली असून जनतेचे हेच प्रेम माझा विजय साकारुन मतदार संघात मोठे परिवर्तन घडवेल,” असा विश्वास शिरूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी व्यक्त केला. तसेच येत्या काळात शिरूर-हवेलीत विकासकामांसाठी ५ हजार कोटींचा निधी देण्याचे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्याने शिरुर-हवेलीचा कायापालट होणार असल्याचीही ग्वाही कटके यांनी यावेळी दिली. तर अजितदादा पवार यांनी कोरेगाव भीमा गावाला सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचा विकासनिधी दिल्याचे विठ्ठलराव ढेरंगे यांनी सांगितले. माजी सरपंच विक्रम गव्हाणे यांनी स्वागत केले, सुत्रसंचालन संपतराव गव्हाणे यांनी केले. तर केशवराव फडतरे यांनी आभार मानले.


—-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button