कोरेगाव भीमा येथे फ्रेंड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून भक्तीमय वातावरणात पालखी सोहळा साजरा
पालखी सोहळ्यात विठ्ठल नामाचा जयघोष करीत विद्यार्थ्यांनी साकारले रिंगण
पुणे : येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ढोल, ताशा, लेझिमच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत फ्रेंड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संतांच्या वेशभूषेत भक्तीमय वातावरणात पालखी सोहळा साजरा केला.
हातात भगवा झेंडा घेत व पालखीत पांडुरंग व रुख्मिणी मातेच्या प्रतिमा घेवून वारकरी संप्रदायाचा पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानोबा तुकाराम’ असा नामघोष करीत सर्वांचे लक्ष वेधले. या सोहळ्यामध्ये नर्सरी विभागापासून इयत्ता दहावीच्या वर्गापर्यंतच्या सर्व मुलांनी आणि मुलींनी उस्फूर्त सहभाग घेतला.
फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालकांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, सचिव दिलीप भोसले, उपाध्यक्ष प्रकाश खेरमोडे, संचालक शंकर गव्हाणे, संचालक रामदास सव्वाशे, संचालक राजेंद्र गव्हाणे, संचालक सुनील दुगड संचालक राजेंद्र गव्हाणे, संचालक डॉ. संजय पाटील, संचालक जयकांत देशमुख तसेच कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे आदींनी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी व शिक्षकांनी रिंगण करून फुगडीचे विविध प्रकार सादर केले. टाळ, मृदंगाच्या तालावर भजन गायन केले. पालखी सोहळ्याची सांगता पसायदानाने झाली. पालखी सोहळ्याचे नियोजन उपमुख्याध्यापिका सौ अजिताकुमारी नायर यांच्या मार्गदर्शकनाखाली नर्सरी विभागाच्या प्रमुख निर्मला गव्हाणे, प्राथमिक विभागाच्या प्रमुख सौ वैशाली वाळुंज आणि वैशाली धर्माधिकारी तसेच माध्यमिक विभागाचे वरिष्ठ शिक्षक मारुती दरेकर, सत्यम हंबीर , शंकर बोरकर, भाविन सैंदाणे, श्रीमंत प्रताळे, प्रियंका फडतरे, शितोळे मॅडम, जाधव मॅडम , अनिता हुंबे इतर सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली धर्माधिकारी यांनी केले तर सत्यम हंबीर यांनी आभार मानले.
……………