प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय रामचंद्र भूमकर यांचे निधन
उद्योग, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या भुमकर परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक
पुणे : लोणीकंद परिसरातील प्रसिद्ध उद्योजक तथा श्री रामचंद्र शिक्षण संस्थेचे खजिनदार दत्तात्रय रामचंद्र भूमकर (वय ७३) यांचे आज (ता.१५) सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.
उद्योग, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या भूमकर परिवारातील जेष्ठ मार्गदर्शक अशी ओळख असलेल्या दत्तात्रय (आण्णा) भूमकर यांच्या पश्चात तीन भाऊ, एक बहीण, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अत्यंत परिश्रमातून वाहन मालक ते लोणीकंद येथील खाण व्यवसायातील प्रथम उद्योजक असा नावलौकिक मिळवलेल्या दत्तात्रय (आण्णा) भूमकर यांचे श्रीरामचंद्र शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात तसेच शिरूर – हवेली परिसरातील धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातही मोठे योगदान व सक्रिय सहभाग असे.
……