लोणीकंद गावच्या सरपंचपदी सौ. मोनिका श्रीकांत कंद यांची बिनविरोध निवड
प्रदिपदादा कंद यांच्या कुटुंबाला पाचव्यांदा सरपंचपदाची संधी
पुणे : पुर्व हवेलीतील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या लोणीकंद गावच्या सरपंचपदी सौ.मोनिका श्रीकांत कंद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान गावच्या राजकारणात केंद्रबिंदु असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिपदादा कंद यांच्या कुटुंबात पाचव्यांदा सरपंचपद आल्याने गावच्या विकासाची वाटचाल अधिक गतीमान होणार आहे.
सौ.प्रियंका योगेश झुरुंगे यांनी दि ९ मे २०२४ रोजी राजीनामा दिल्याने दरम्यानच्या कालावधीत उपसरपंच राहूल शिंदे यांनी प्रभारी सरपंचपदाचा कार्यभार सांभाळला. अप्पर तहसिलदारांच्या आदेशानुसार आज लोणीकंद ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. मंडलाधिकारी संदीप झिंगाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीत सौ. मोनिका श्रीकांत कंद यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी संदीप झिंगाटे यांनी त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच मोनिका श्रीकांत कंद यांचा मिरवणुक काढत सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायणराव कंद, उपसभापती रविंद्र कंद, माजी सरपंच श्रीकांत कंद, अनिल होले, गजानन कंद, माजी सरपंच लक्ष्मीताई कंद, लिना कंद, सुलोचना झुरुंगे, प्रियंका झुरुंगे, प्रभारी सरपंच राहुल शिदे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर कंद, गौरव झुरंगे, सागर कंद, आशिष गायकवाड, नंदकुमार कंद, ओंकार कंद, अतुल मगर, सरस्वती दळवी, डॉ सोनाली जगताप, दिपाली राऊत, सुप्रिया कंद, कावेरी कंद, सुजाता कंद तसेच सोमेश्वर महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा पुजाताई कंद आदींसह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
समाजकारणाला प्राधान्य देत लोणीकंद गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असून वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामपंचायत कार्यकारणी व सर्व संबंधित घटकांच्या सहयोगातून नागरी हितासाठी पिण्याचे शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापन, तसेच दर्जेदार रस्ते आदींसह विविध विकासकामे करण्याचा प्रयत्न करणार आहे.
सौ. मोनिका श्रीकांत कंद, नवनिर्वाचित सरपंच, लोणीकंद.
—————-
कंद कुटुंबात पाचव्यांदा सरपंचपद
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिपदादा कंद यांचे कंद कुटुंब हे आजवर लोणीकंद गावच्या राजकीय वाटचालीचा केंद्रबिंदु राहीले असून या कंद कुटूंबात पाचव्यांदा सरपंचपद आले आहे.लोणीकंद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी यापुर्वी विद्याधर कंद, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपद भुषवलेले प्रदीपदादा कंद, त्यांच्या वहिनी सौ.अनिता दिलीप कंद तसेच बंधु श्रीकांत कंद व आता पुन्हा श्रीकांत कंद यांच्या सौभाग्यवती मोनिका श्रीकांत कंद यांची सरपंचपदी निवड झाल्याने कंद कुटुंबात पाचव्यांदा सरपंचपद आले आहे. तर प्रदीपदादा कंद यांच्या मातोश्री सुरेखा कंद यांनीही जिल्हा परिषदेचे सदस्यपद भुषवले आहे.
—————-