शेतकरी व नागरी प्रश्नांवर विधिमंडळात आमदार ॲड.अशोक पवार यांची धडाडली तोफ
विधिमंडळात शेतकरी वर्ग तसेच शिरूर हवेली मतदारसंघातील नागरिकांचे मांडले प्रश्न
पुणे : शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी कांदा निर्यातबंदी, दुध दर यामुळे आणखी अडचणीत आलेला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतानाच आयपीएफ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने गरीब रुग्णांचे हाल होत असल्याकडे लक्ष वेधले. तसेच शिरूर मतदार संघातील नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी, तसेच वाघोली परिसरातील नागरी प्रश्नांकडेही सभागृहाचे लक्ष वेधले.
अगोदरच शेतकरी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस अशा नैसर्गिंक संकटात सापडलेला असताना पुन्हा कांदा निर्यातबंदीमुळे आणखी अडचणीत आल्याचे सांगत त्यांना नुकसान भरपाई देण्याकउे लक्ष वेधले. तर दुसरीकडे शेतीत पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने दुग्ध व्यवसायाचा जोडधंदा करणाऱ्या अनेक शेतकरी माता भगिनी दुधाला दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडल्याचेही नमुद करताना अनुदानासाठी तातडीने इयर टॅगिंगची अटही जाचक असल्याकडे लक्ष वेधले.
दरम्यान महाराष्ट्मध्ये साडेपाचशे हॉस्पिटल आणि जवळपास वर्षाला अडीच हजार कोटी रुपये खर्च होणाऱ्या धर्मादाय रुग्णालयाच्या आयपीएफ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. शासन याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज असल्याकउेही त्यांनी लक्ष वेधले. तर साडेतीन लाख लोकसंख्येच्या वाघोलीत ग्रामीण रुग्णालय मंजुर झाले मात्र पुढील कार्यवाही रखडल्याने रुग्णांचे हाल होत असल्याने ग्रामीण रुग्णालयाचे काम तातडीने पुर्ण करण्याची मागणी केली. तसेच वाघोलीत अंतर्गत रस्ते, पाणी, डे्रनेज या समस्यांकडेही आमदार अशोक पवार यांनी लक्ष वेधले.
दरम्यान साखर कारखान्याला थकहमी देतानाही दुजाभाव केला जात असल्याचे सांगत निवडकच कारखान्यांना सरकारने थकहमी दिल्याने थकहमी न मिळालेल्या सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
————–