सुभाष (दादा) लक्ष्मण कंद यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध मान्यवरांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा
पांडुरंग सुभाष कंद व समस्त कंद परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान सोहळयासह विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
पुणे : लोणीकंद (ता. हवेली), दत्तनगर येथे स्व.सुभाष (दादा) लक्ष्मण कंद यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पांडुरंग सुभाष कंद व समस्त कंद परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान सोहळयासह विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पांडुरंग कंद यांनी दिली.
या कार्यक्रमांमध्ये सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत ह.भ.प.श्री. शंकर महाराज शेवाळे यांचे कीर्तन, गायनाचार्य ह.भ.प. ओंकार महाराज जगताप यांचे गायन, सकाळी ११.३० ते १२ दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ व पुरस्कार वितरण होईल.
तर दुपारी 12 ते 12.30 वाजे पर्यंत सन्मित्र शिक्षण संस्थेतील मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होईल. तसेच दुपारी 12.30 ते 1 या दरम्यान सत्कारमूर्तीचे मनोगत होईल. तसेच दुपारी 1 या दरम्यान अन्नप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप होईल.
दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत संगीत विशारद गायिका सौ.सुषमाताई आव्हाळे व लोणीकंद येथील समस्त भजनी मंडळ यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती निमंत्रक पांडुरंग सुभाष कंद यांनी दिली.