लोणीकंद येथे श्री खंडोबा यात्रा व शिवजयंतीनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत २६० बैलगाडे सहभागी
पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदिपदादा कंद यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले
पुणे: लोणीकंद येथे श्री खंडोबा देवाची यात्रा व शिवजयंती उत्सवानिमित्त शिवाजीयन्स गृप व लोणीकंद बैलगाडा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैलगाडा शर्यतीत शिवराज नारायण आव्हाळे यांच्या बैलगाड्याने दोन्हीही दिवशीच्या फायनलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. दोन दिवस चाललेल्या या बैलगाडा शर्यतीत एकुण २६० बैलगाड्यांनी सहभाग घेतला.
पहिला दिवस प्रथम : शिवराज नारायण आव्हाळे, व्दितीय : वाघोली येथील रामशेठ गुलाबराव भाडळे व लखन पवार. तृतीय : साकोरे व प्रदिप टिंगरे. चौथा क्रमांक : सणसवाडी येथील पै.बाबासाहेब चंदरराव दरेकर व प्रतिक वाघमारे. तर पाचवा क्रमांक : दुर्योधन दगडू शिंगाडे, सहावा क्रमांक : विनायक आबा मोरे व श्री.जाधव. पहिल्या दिवसाचा घाटाचा राजा किताब पै.किरण संपत साकोरे यांनी मिळवत चांदीची गदेचा मान मिळवला.
तर दुस-या दिवशी प्रथम क्रमांक परत एकदा शिवराज नारायण आव्हाळे यांनी मिळवला. व्दितीय : रामनाथशेठ विष्णू वारिंगे व प्रशांत भागवत, तसेच दशरथशेठ ज्ञानोबा ठाकूर , तिसरा क्रमांक रामदास सोपान दरेकर सणसवाडी, चौथा क्रमांक : कै.दिनकर सखाराम साकोरे फुलगाव व रामशेठ गुलाबराव भाडळे, पाचवा क्रमांक : पांडुरंग काळे गव्हाणवाडी, तर दुस-या दिवशी घाटाचा राजा हा किताब रामनाथशेठ विष्णू वारिंगे व प्रशांत भागवत यांच्या जोडीने मिळवत चांदीची गदा पटकावली ओरीजनल सप्तहिंदकेसरी बकासुर (सरपंच) या नावाजलेल्या बैलाचाही आगळा वेगळा सन्मान सोहळा यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदिपदादा कंद यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी माजी सभापती नारायणराव आव्हाळे, उद्योजक संदेश आव्हाळे, माजी उपसभापती रविंद्र कंद, माजी सरपंच अनिल होले, सरपंच किरण साकोरे ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब सातव, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष प्रमोद भाडळे, उद्योजक सचिन भाडळे, संतोष तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन शिवाजीयन्स गृपचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल एकनाथ कंद माजी उपसरपंच गजानन कंद, माऊलीआबा कंद, सचिन लोखंडे, निलेश कंद, किरण झुरुंगे आदींनी केले