बी. जे. एस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात अनुभवला पक्षी अभयारण्य अभ्यास
पुणे : भारतीय जैन संघटना महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागातर्फे प्रथम वर्ष विज्ञान या वर्गातील विद्यार्थ्यांची प्राणीशास्त्र प्रात्यक्षिक अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक सहल दिनांक १३ फेब्रुवारी रोजी पक्षी अभयारण्य कुंभारगाव, भिगवन येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी निसर्गातील विविध पक्षी, त्यांची जीवनशैली, खाद्य, आवाज, रंग,ऋतू नुसार त्यांचे जीवन याबाबत सखोल व शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांचा निसर्ग व पक्षी जीव सृष्टी याबाबत मोलाचे ज्ञान मिळाले.
त्यावेळी एकूण ३० विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पक्षीनिरीक्षक उमेश सल्ले यांनी विद्यार्थ्यांना पक्ष्यांबद्दल माहिती देत पक्षी अभ्यास व निरीक्षण यांचे अनमोल मार्गदर्शन केले.
सदर शैक्षणिक सहलीचे यशस्वीपणे नियोजन प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. माधुरी देशमुख तसेच वर्गशिक्षक प्रा. प्रदीप आव्हाड, प्रा.डॉ. तेजल देवकर, प्रा.डॉ. सादिया शेख आणि प्रयोगशाळा सहाय्यक आम्रपाली आयवळे यांनी केले. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड आणि विज्ञान शाखाप्रमुख डॉ. मनीषा बोरा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.